SUKANYA SAMRIDDHI YOJANA 2024
SUKANYA SAMRIDDHI YOJANA 2024 देशातील मुलींचे उज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकार ने हे सुकन्या समृद्धी योजना २०२४ ची घोषणा केली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमीच देशातील जनतेसाठी नवनवीन कल्याणकारी योजना घेऊन येत असते त्यामधीलच सुकन्या समृद्धी योजना हि देखील एक आहे. आयकर कायदा ८० c अतंर्गत वाजवट ची सवलत देखील देण्यात येते.या योजनेसाठी मुलीच्या नावाने पोस्ट मध्ये किंवा बँक मध्ये खाते उघडण्यात येते. मुलीचे वय १० वर्ष होण्याअगोदर हे खाते उघडले गेले पाहिजे असे प्रावधान कण्यात आले आहे.
१० वर्ष पेक्षा कमी वय असलेल्या मुलीच्या नावाने कुठलेही व्यक्ती सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत या मध्ये गुतंवणूक करू शकतो. मुलीचे वय १० वर्ष होण्याअगोदर हे खाते उघडणे गरजेचे आहे . मुलगी १८ वर्षाची होईपर्यंत मुलीचे आई वडील किंवा पालक हे खाते चालवतील वय १८ वर्ष झाल्यानंतर मुलगी एकट्याने हे खाते चालवू शकते. या योजनेंतर्गत कमीतकमी ७५० रुपये तर जास्तीतजास्त १.५ लाख रुपये एवढी गुतंवणूक या योजनेत केली जाऊ शकते.सध्या योजनेंतर्गत जमा होणार्या धन राशी वर ७.६ % वार्षिक असे व्याज दिले जाणार आहे.
सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्या संधर्भात
१० वर्षाखालील कुठल्याही मुलीच्या नावाने खाते तिचे पालक उघडू शकतात.
मुलीच्या नावाने कुठल्याही पोस्ट ऑफिस मध्ये किंवा कुठल्याही बँक मध्ये फक्त एकच खाते उघडले जाऊ शकते.
सुकन्या समृद्धी योजना चे खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त २ मुलींसाठी उघडले जाऊ शकते , जुळ्या किंवा तिप्पट असा जन्म झालेल्या मुलींसाठी जास्त खाते उघडले जाऊ शकतात.
एका आर्थिक वर्षात किमान २५० रुपये तर जास्तीत जास्त १.५ लाख एवढी रक्कम एक रक्कमी किंवा वेगवेगळ्या हप्त्यामध्ये जमा केली जाऊ शकते.जर एका आर्थिक वर्षात २५० रुपये पेक्षा कमी रक्कम खात्य्वर जमा केली गेली तर असे खाते default घोषित करण्यात येईल.असे खातेपुनार्जीवीत करता येईल.
खाते उघड्लेच्या तारखेपासून जास्तीत जास्त १५ वर्ष हे खाते चालू ठेवण्यात येईल.
आयकर उत्पन्न कायद्याच्या ८० c अतंर्गत ठेवी या वाजवती साठी पात्र आहेत.
सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात २२ जानेवारी २०१५ साली माननीय नरेद्र मोदी यांनी यांच्या हस्ते बेटी बचाव बेटी पढाव या अभियानातर्गत सुरु करण्यात आली आहे. हि योजना मुलींसाठी एक महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. मुलींचे शिक्षण, मुलींचे आरोग्य त्यांचे लग्न किंवा त्यांचे उज्वल भविष्य यासाठी हि योजना अतिशय महत्वाची तसेच फायदेशीर आहे.
सुकन्या समृद्धी योजना चा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र राज्यातील मुलींचा सामाजिक,आर्थिक विकास करून त्यांचे जीवनमान उंचावणे तसेच त्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांचे उज्वल भविष्य घडून त्यांना आत्मनिर्भर बनविणे असे आहे.
सुकन्या समृद्धी योजना चे उद्देश
सुकन्या समृद्धी योजना चे उद्देश खालीलप्रमाणे आहेत.
- मुलीचे आर्थिक भविष्य सुधारण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- गरीब कुटुंबातील मुलीने भविष्यात आत्मनिर्भर बनावे असे या योजनेचे उद्देश आहे.
- गरीब कुटुंबातील मुलीना भविष्यात सन्मानाने जगता यावे असा विचार करून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींचे सामाजिक व आर्थिक विकास करणे.
- भविष्यात मुलीना उच्च शिक्षणा साठी प्रोत्साहित करणे.
- मुलीना आत्मनिर्भर बनविणे असे या योजनेचें लक्ष आहे.
सुकन्या समृद्धी योजना साठी लागणारे कागदपत्रे
सुकन्या समृद्धी योजना साठी लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.
- सुकन्या समृद्धी योजना अचूक भरलेला अर्ज
- अर्जदार मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईझ फोटो
- पॅनकार्ड
- मुलीच्या पालकांचे आधारकार्ड
- निवडणूक ओळखपत्र
- रहिवासी पुरावा
- मँट्रीक प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
सुकन्या समृद्धी योजना देणाऱ्या बँका
सुकन्या समृद्धी योजना चा अर्ज पोस्ट ऑफिस किंवा योजनेशी संलग्नित असलेल्या खाजगी बँक मध्ये मिळू शकतात .
याशिवाय सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज रबी च्या वेबसाईट वर सुद्धा उपलब्ध आहे.
सुकन्या समृद्धी योजना देणाऱ्या बँका खालीलप्रमाणे आहेत.
- इंडियन बँक
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ इंडिया
- पंजाब अंड सिंध बँक
- इंडियन ओवरसीज बँक
- युको बँक
- idbi बँक
- बँक ऑफ बडोदा
- बँक ऑफ इंडिया
- hdfc बँक
- कॅनरा बँक
- सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
- एक्सिस बँक
- युनियन बँक ऑफ इंडिया
- पंजाब नॅशनल बँक
- icici बँक
सुकन्या समृद्धी योजनेचा वैशिष्ट्य
सुकन्या समृद्धी योजनेचा वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहेत .
- सुकन्या समृद्धी योजना हि योजना राज्य सरकार मार्फत मुलींचे भविष्य समृध्द आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ खाते उघडल्यापासून ते मुलीचे वय २१ वर्ष पूर्ण होईपर्यंत घेता येतो.
- मुलीचे वय २१ वर्ष होईपर्यंत कालावधी नमूद केला असला तरी योजनेचे पैसे सुरुवात केल्यापासून फक्त १५ वर्ष पर्यंत भरायचे आहेत.
- मुलीचे वय २१ वर्ष होण्या अगोदर जर मुलीचे लग्न झाले तर तिचे या योजनेशी काहीही संबंध राहणार नाही.
- या योजनेंतर्गत जमा केलेल्या पैसा वर कुठलाही टॅक्स द्यावा लागणार नाही.
- योजनेंतर्गत दर वर्षी २५० रुपये जमा करणे गरजेचे आहे तसे न केल्यास सुकन्या समृद्धी योजनेचे ते खाते बंद करण्यात येईल. असे बंद केलेले काटे जर परत चालू करायचे असेल तर ५० रुपये प्रती वर्ष असा दंड भरून ते खाते पुनर्जीवित करता येईल.
- सुकन्या समृद्धी योजना पूर्णपणे सुरक्षित मानण्यात येते.
- सुकन्या समृद्धी योजना मध्ये ज्या व्यक्तीच्या नावाने रक्कम भरण्यात येत आहे अश्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबाला जमा झालेल्या रक्कम आणि व्याज मिळून जि रक्कम होईल ती देण्यात येईल.
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत १५ वर्ष पर्यंत रक्कम गुंतवणूक करता येईल. या योजनेमध्ये बँक ज्या प्रकारे पैसे स्वीकार करू शकतात जसे कि चेक,ड्राफ्ट किंवा रोख अश्या कुठल्याही प्रकारे पैसे जमा करता येतील.सुकन्या समृद्धी योजनेमध्ये online पद्धतीने देखील पैसे जमा करता येतील फक्त त्यसाठी बँक खात्यामध्ये त्य प्रकारे सुविधा सुरु केलीली असावी.चेक किंवा ड्राफ्ट द्वारे पैसे जमा केल्यास ज्या दिवशी ते पैसे खात्यामध्ये जमा होतील त्या दिवसा पासून त्या रक्कम चे व्याज गृहीत धरण्यात येईल जर online पैसे जमा केले असतील त्या दिवशी पासून लगेच व्याज गृहीत धरले जाईल.
सुकन्या समृद्धी योजना साठी ची पात्रता
सुकन्या समृद्धी योजना साठी ची पात्रता खालीलप्रमाणे आहेत.
- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारतीय असणे गरजेचे आहे.
- सुकन्या समृद्धी योजना हि फक्त मुलीं साठी आहे.
- सुकन्या समृद्धी योजना चे पैसे फक्त त्या मुलीचे पालकच त्या मुलीच्या नावाने जमा करू शकतील.
- सुकन्या समृद्धी योजनेचे खाते सुरु करते वेळी मुलीचे वय १० वर्ष पेक्षा कमी असावे.
- सुकन्या समृद्धी योजना चे फक्त एकाच खाते उघडू शकतो .
- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ दत्तक मुलीसाठी देखील घेता येऊ शकतो.फक्त त्या साठी दत्तक घेतलेले सर्व कागदपत्रे असावीत.
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कसे उघडावे ?
- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्वप्रथम जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँक मध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज प्राप्त करावा लागेल.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक अशी भरावी.
- अर्ज पूर्णपणे भरून झाल्यावर अर्जासोबत गरजेचे सर्व कागदपत्रे जोडावीत.
- हा अर्ज सर्व कागदपत्रे जोडून बँक मध्ये किंवा त्याचं पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावा लागेल .
- सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी २५० रुपये इतका प्रीमियम जमा करावी लागतील तरच सुकन्या समृद्धी चे कागदपत्रे जमा केली जाऊ शकतात.
- त्या नंतर तेथील कर्मचारी कडून दिलेला अर्ज जमा करता येईल.
- अश्या प्रकारे अत्यंत सोप्या पद्दतीने सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज जमा करून खाते उघडता येईल.
योजनेचे नाव | सुकन्या समृद्धी योजना |
कोणी सुरु केली | केंद्र सरकार द्वारे |
लाभार्थी | ० ते १० वर्ष वय असणाऱ्या भारतीय मुली |
उद्दिष्ठ | मुलींचे भविष्य सुधारणे |
गुतंवणूक रक्कम | किमान २५० रुपये / कमाल १.५ लाख रुपये |
गुंतवणूक कालावधी | १५ वर्षांपर्यंत |
व्याजदर | ८ % प्रतिवर्ष |
योजना वर्ष | २०२४ |
आता महिलांना स्वयंपाक घरातील त्रास होणार कमी आणि पैशाची पण बचत होणार.
सुशिक्षित बेरोजगार आहात का? सरकार तुम्हाला देणार महिना ५००० रुपये भत्ता.
घर बांधकामासाठी शासन देणार १.३० लाख रुपये इतके अनुदान. जानून घ्या तुम्हाला मिळतील का?
राज्यातील गरीब विधवांना मिळणार दर महिन्याला पेन्शन . किती आणि कसा बघा.
गरोदर महिलांसाठी खुश खबर! ,मिळणार अनुदान . कसे ते बघा.
तरुणपणी कमवा आणि म्हातारपणात मिळवा खात्रीपूर्वक पेन्शन
शेती मशागती साठी विकत घ्या ट्रक्टर ,सरकार देणार भरभरून आर्थिक अनुदान.
सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.
सर्व वाचकांना एक विनंती हि वेब साईट केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाही किंवा त्या संबंधी देखील नाही. जर आपण वर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे या योजनेबद्दल काही निर्णय घेणार असणार तर कृपया वर दिलेली माहिती परत एकदा पडताळून बघा आणि मगच हवा तो निर्णय घ्यावा. आम्ही फक्त या योजनेची माहिती आपल्या मराठी वाचकांना आपल्या मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या उद्देशाने हा प्रयत्न केला आहे. कृपया याची नोंद घ्यवी.
जर आपण आमच्या या लेखाबद्दल किंवा आमच्या वेबसाईट बद्दल जर काही अभिप्राय देऊ इच्छित असणार तर कृपया आम्हाला abhimanmaarathi@gmail.com या मेल आयडी लिहून कळवावा.
धन्यवाद.