BEROJGARI BHATTA YOJANA 2024|बेरोजगारी भत्ता योजना २०२४

BEROJGARI BHATTA YOJANA

BEROJGARI BHATTA YOJANA

BEROJGARI BHATTA YOJANA |बेरोजगारी भत्ता योजना २०२४ जर तुम्हाला महिन्याला ५००० रुपयांपर्यंत अनुदान हवे असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. जसा संपूर्ण देशात बेरोजगारी आहे तशीच महाराष्ट्र राज्यात देखील आहेच.राज्यातील सुशिक्षित तरुणांना त्यांच्या शिक्षणाच्या आणि त्यांच्या कौशल्याच्या प्रमाणात रोजगार उपलब्ध नाहीत.या सगळ्या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकार ने बेरोजगारी भत्ता योजना ची सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना दर महिन्याला सरकार कडून बेरोजगारी भत्ता म्हणून एक ठराविक रक्कम मिळेल.

महाराष्ट्र राज्यातील असे खूप सारे तरुण आहेत जे सुशिक्षित असून देखील नौकरी ची संधी न मिळाल्यामुळे बेरोजगार आहेत. अश्या तरुणांना समाजात खूप साऱ्या अडचणींना तोंड द्यावे लागते . समाजात कधी कधी मानहानी देखील होते . समाजातील अश्या तरुणांना लक्षात घेऊन हि योजना सुरु करण्यात आली आहे.बेरोजगारी भत्ता योजनेचे मुख्य उद्देश्य हेच आहे कि समाजातील अश्या सुशिक्षित बेरोजगारांना दर महिन्याला एक ठराविक रक्कम भत्ता म्हणून देण्यात यावी जेणेकरून अश्या तरुणांना काही अंशी का असेना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करून समाजात मानाने जगता येईल.अश्या तरुणांना देण्यात येणारा हा बेरोजगारी भत्ता त्यांना जोपर्यंत एक चागली त्यना हवी तशी नौकरी मिळत नाही तोपर्यंत मिळत राहणार. हा भत्ता देण्यासोबतच सरकार त्या तरुणांना कौशल्य वाढीचे प्रशिक्षण आणि त्या सबंधित नौकरीच्या संधी देखील उपलब्ध करून देत जाणार आहे.

समाजातील आणि पर्यायी देशातील बेरोजगारी चे प्रमाण कमी करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यतून कुशल असे कामगार तयार करणे असा विचार सरकारचा या मागे आहे. महारष्ट्र राज्यातील ज्या तरुणांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या तरुणांना बेरोजगारी भत्ता योजना २०२४ (BEROJGARI BHATTA YOJANA) चा अर्ज भरून जमा करावा लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बेरोजगार तरुण हा कमीतकमी १२ वी पास असणे गरजेचे आहे. अर्ज भरून झाल्यावर जर त्याला मंजुरी मिळाली तर महाराष्ट्र सरकार कडून त्या तरुणाला महिन्याला ५००० रुपये इतकी रक्कम भत्ता म्हणून थेट त्या तरुणाच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

बेरोजगारी भत्ता म्हणून मिळणारी रक्कम हि थेट बँक खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे त्या तरुणाचे बँक मध्ये खाते असणे गरजेचे आहे आणि ते बँक खाते त्या तरुणाच्या आधार कार्ड शी संलग्नित असणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र सरकार ने जाहीर केलेल्या या योजनेमुळे सुशिक्षित बेरोजगार तरुण नौकरी नसल्यामुळे ज्या आत्महत्त्या करणे किंवा नैराश्या ला बळी पडणे अश्या ज्या घटना घडत होत्या त्या या मुळे आटोक्यात येतील. सुशिक्षित बेरोजगारांना जगण्याची एक नवी उमेद या योजनेमुळे मिळेल आणि एक संतुलित समाजाची रचना घडण्यास याची मदत मिळेल. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही नौकरी न मिळणे आणि त्यामुळे नैराश्य येणे हे खूप प्रमाणात समाजात बघण्यास मिळते आणि त्या नंतर समाजातील इतर लोकांकडून मिळणारी वागणूक हे सुद्धा त्या साठी एक कारण ठरू शकते.या सर्व कारणांचा आणि त्यांच्या परिणामांचा विचार करून महाराष्ट्र सरकार कडून या कल्याणकारी योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता ( pradhanmantri berojgari bhatta 2024) या योजनेबद्दल खालीलप्रमाणे माहिती घेणार आहोत.

  • प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजना बद्दल
  • प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजनेचे पात्रता नियम
  • प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये
  • प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजने साठी लागणारे कागदपत्रे
  • प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजनेचा अर्ज कुठे आणि कसा करावा
  • प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजनेबद्दल असणारे प्रश्न

प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजना (BEROJGARI BHATTA YOJANA 2024) बद्दल

हि योजना राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मासिक भत्ता देऊन त्यांना त्यांच्या मुलभूत गरजा काही अंशी का असेना पूर्ण करता याव्यात या संधर्भात आहे. रोजगाराची संधी न मिळाल्या कारणाने तरुणाला समाजात मानहानी चा सामना करावा लागू नये अशी या योजनेमागे दूरदृष्टी महाराष्ट्र सरकारची आहे.

berojgari bhatta yojana

प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजनेचे (BEROJGARI BHATTA YOJANA 2024) पात्रता नियम

प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजनेचे पात्रता नियम खालीलप्रमाणे आहेत.

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित तरुण अथवा तरुणी हि महाराष्ट्र राज्याची मुळ निवासी असणे गरजेचे आहे.
  • महाराष्ट्र राज्याबाहेरील तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • इच्छुक अर्ज दाराचे वय कमीतकमी १८ वर्ष आणि जास्तीतजास्त ३५ वर्ष असणे गरजेचे आहे.
  • ज्या तरुण तरुणींना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचे शिक्षण कमीतकमी १२ वी पास असणे गरजेचे आहे.
  • या योजनेचा मिळणारा लाभ ( बेरोजगारी भत्ता ) हा थेट बँक खात्यामध्ये जमा होणार असल्या कारणाने त्या तरुण अथवा तरुणीचा बँक खाते क्रमांक असणे गरजेचे आहे. आणि हा बँक खाते क्रमांक त्या अर्जदाराच्या आधार कार्ड शी संलग्नित असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार तरुण किंवा तरुणी हि कुठल्याही सरकारी किंवा खाजगी नौकारी अथवा व्यवसायाशी संबंधित नसावा.
  • अर्जदार तरुण किंवा तरुणीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये पेक्षा जास्त नसावे .
  • अर्जदार तरुण किंवा तरुणी हि पूर्णपणे बेरोजगार असावी , त्यांचा कुठल्याही सरकारी किंवा खाजगी कार्यालयाशी नौकरी सारखे संबंध नसावेत.

गर्भवती मातांना आणि त्यांच्या गर्भाला मिळणार खास आर्थिक मदत

तरुणपणात वाचवा आणि म्हातारपणात मिळवा हमखास पेन्शन

शेतात ट्रक्टर घेण्यासाठी सरकार करणार आर्थिक मदत.

प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजना (BEROJGARI BHATTA YOJANA 2024) चे फायदे आणि वैशिष्ट्ये

प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजना चे फायदे आणि वैशिष्ट्ये हे खालीप्रमाणे आहेत.

  • महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित तरुणांना लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने हि योजना सुरु केली आहे.
  • राज्यातील जे तरुण किंवा तरुणी सुशिक्षित असून देखील बेरोजगार आहेत अश्या सगळ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • या योजनेंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना महारष्ट्र सरकार कडून मासिक ५००० रुपये इतकी रक्कम आर्थिक मदत म्हणून देण्यात येणार आहे.
  • या सुशिक्षित बेरोजगारांना जोपर्यंत हवी तशी नौकरी मिळत नाही तोपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • हि योजना तरुणांना ठराविक वेळे साठी या सुशिक्षित अर्जदारांना या योजनेचा लाभ देणार आहे.
  • युवक या मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा उपयोग त्याच्या महत्वाच्या दैनंदिन कामासाठी करू शकतील.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुण अथवा तरुणीचे शिक्षण कमीतकमी १२ वी पास असणे गरजेचे आहे.

महिलांचा स्वयंपाक घरातील त्रास होईल कमी आणि पैसे पण वाचतील . कसा ते जाणून घ्या .

प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजना (BEROJGARI BHATTA YOJANA 2024) साठी लागणारे कागदपत्रे

प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजना साठी लागणारे कागदपत्रे खालीप्रमाणे आहेत.

  • ओळखपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • वयाचा दाखला
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • शैशनिक प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईझ चा फोटो
BEROJGARI BHATTA YOJANA

प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजना (BEROJGARI BHATTA YOJANA 2024) चा अर्ज कुठे आणि कसा करावा

महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना जर या प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या साठी खालीप्रमाणे अर्ज करावा लागेल.

अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.

  • ज्या बेरोजगाराला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याला सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. वेबसाईट वर गेल्यावर मुखपृष्ठ उघडेल.
  • त्या पेज वर तुम्हाला जॉब सिकर चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्या नंतर तुमच्या समोर लोगिन चा फॉर्म ओपन होईल.या ठिकाणी रजिस्टर चा पर्याय दिसेल त्या वर क्लिक करून एक नवीन पेज ओपन होईल.
  • या पेज वर एक फॉर्म दिसेल त्या फॉर्म मध्ये तुमचे नाव , आधार कार्ड नंबर ,मोबाईल नंबर अशे सर्व माहिती टाकल्यानंतर सबमिट करण्यास विचारले जाईल.
  • या नंतर प्धील माहिती साठी विचारले जाईल,पुढे गेल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल हा OTP दिलेल्या BOX मध्ये टाकावा लागेल.
  • त्या नंतर सबमिट बटन वर जाऊन क्लिक करावा लागेल.
  • या नंतर परत पहिल्या पेज वर जाऊन युझर नेम, पास वर्ड टाकून दिलेला कडे समोर दिलेल्या BOX मध्ये टाकून लोगिन करता येईल.
  • लोगिन झाल्यावर समोर आलेला फॉर्म मध्ये सर्व माहिती अचूक टाकून फॉर्म सबमिट केला जाऊ शकतो.
BEROJGARI BHATTA YOJANA

सर्व वाचकांना विनंती आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये जर असे कोणी तरुण असतील जे सुशिक्षित असून देखील बेरोजगार आहेत अश्या तरुणांना या योजनेची माहिती द्या किंवा त्यांना आमचा हा लेख वाचण्यास सांगावा जेणेकरून त्यांना या योजनेची माहिती मिळेल आणि जर ते पात्र असतील तर त्यांना या योजनेचा फायदा घेता येईल आणि पर्यायाने त्यांना त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यास मदत होईल.

योजनेचे नाव प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना ( बेरोजगार भत्ता योजना)
कोण राबवत आहे महाराष्ट्र सरकार
राज्य महाराष्ट्र
योजनेची सुरुवात कधी झाली २०२०
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार
अधिकृत वेबसाईट क्लिक करा
विभाग कौश्याल्य विकास , रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय ,महाराष्ट्र शासन
अर्ज करण्याची पद्धत online
वर्ष २०२४
उद्देश राज्यातील बेरोजगार तरुणांना बेरोजगार भत्ता प्रदान करून प्रोत्साहित करणे.

वाचकांना अजून एक विनंती हि वेबसाईट केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची नाही किंवा त्यांशी संबंधित देखील नाही . तरी वर दिलेल्या माहितीच्या आधारे जर आपण या योजने संधर्भात काही निर्णय घेऊ इच्छित असाल तर वर दिलेली माहिती परत एकदा पडताळून बघावी आणि मगच योग्य तो निर्णय घ्यावा , आम्ही फक्त या योजनेची माहिती आपल्या मराठी वाचकांपर्यंत आपल्या मराठी भाषेमध्ये पोहोचावी या साठी हा प्रयत्न केला आहे.

जर तुम्हाला या योजनेबद्दल किंवा आमच्या वेबसाईट बद्दल काही अभिप्राय द्यायचा असेल तर कृपया abhimanmaarathi@gmail.com या वर मेल करू शकतात.

धन्यवाद |