LAKHPATI DIDI YOJANA IN MARATHI
LAKHPATI DIDI YOJANA २०२४ IN MARATHI: लखपती दीदी योजना हि मुख्य करून महिला सक्षमीकरण या उद्देश्याने केंद्र सरकार ने चालू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदि यांनी हि योजना ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी चालू केली आहे.ग्रामीण भागातील महिलांचे कमीत कमी वार्षिक उत्पन्न १ लाख रुपये झाले पाहिजे अशी महत्वाकांशा केंद्र सरकार ची आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार महिलांना लघु उद्योग स्थापन करण्यासाठी प्रोत्साहित करीत असून त्या उद्योग विषयी प्रशिक्षण देखील देणार असा पंतप्रधान यांनी सांगितले आहे. जसे कि प्लंबिंग,LED बल्ब बनविणे,शिलाई मशीन चालविणे अश्या प्रकारचे प्रशिक्षण त्या मध्ये सामील आहे.
LAKHPATI DIDI YOJANA 2024 | लखपती दीदी योजना हि १५ ऑगस्ट २०२३ रोजी चालू करण्यत आली होती.लखपती दीदी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिला छोट्या छोट्या बचत गट तयार करून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होतील .या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे ग्रामीण भागातील भागातील महिलांना ५ लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज देऊन आर्थिकदृष्ट्या बळकट करणे आहे.
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी या वर्षीच्या आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात असे म्हटले कि देशभरातील ९ करोड महिला त्यांच्या ८३ लाख बचत गटाच्या माध्यमातून कसा या लखपती दीदी योजनेचा लाभ घेत आहेत. या महिला न कि केवळ स्वत:चा जीवनमान उंचावत आहेत परंतु इतरांना देखील याचा फायदा करून देत आहेत. ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरण मुले एकूणच ग्रामीण भागातील आर्थिक स्थिती सुधारत आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२०२५ च्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अजून एक घोषणा केली या योजने विषयी, या योजनेचा लाभ आधी २ करोड महिलांना देणार होते आता तोच लाभ ३ करोड महिलांना दिला जाणार आहे म्हणजे या योजनेचे स्वरूप अजून जास्त विस्तृत अशे झाले आहे असे आपण म्हणू शकतो. त्या मध्ये आधीच १ करोड महिलांना या योजनेचा लाभ दिला गेला आहे.
लखपती दीदी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना ज्यांना आधी सतत चा रोजगार आणि नेहमीचा असा उत्पन्न मिळत नवते त्या महिलांना आता नेहमीचा आणि खात्रीचा असा उत्पन्न चे साधन मिळाले आहे. प्रधान मंत्री नरेद्र मोदी यांनी हि योजना फक्त ग्रामीण भागातील महिलांचे आणि त्यामुळे त्यांच्या परिवाराचे दैनंदिन जीवन सुखकर होऊन जीवनमान उंचावे या साठी आखली आहे. ग्रामीण भागात जेथे कि रोजगाराच्या पाहिजे तेवढ्या संधी उपलब्ध नसल्या करणारे महिलांना आर्थिक दृष्ट्या कुणावर तरी अवलंबून राहावे लागते आणि आत्मसन्मान ने जगता येत नाही , अश्या महिलांसाठी हि एक सुवर्णसंधी आहे.
LAKHPATI DIDI YOJANA 2024 |लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून बचत गट स्थापन होऊन महिला शक्ती चे एकीकरण होऊन नवीन नवीन संकल्पना अस्तित्वात येऊ शकतात तसेच ग्रामीण भागातील विविध अश्या कला गुणांना आणि काही विलुप्त होत चाललेल्या साधन साम्ग्रीना देखील नाव संजीवनी मिळेल अशी आशा आहे.
लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून महिलांचे सशक्तीकरण तर होईलच आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने त्यांच्या परिवाराचे देखील आर्थिक उत्पन्न वाढेल. लखपती योजनेमुळे महाग अश्या विमा योजना अगदी कमी रक्कमे मध्ये या महिलांना मिळणार असून त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या परिवारा देखील विमेचे कवच अगदी सहज मिळेल हे खास आहे.
या लेख मध्ये आपण लखपती दीदी योजने | LAKHPATI DIDI YOJANA २०२४ बद्दल खालीलप्रमाणे माहिती घेणार आहोत.
- लखपती दीदी योजनेचे उद्धिष्ट
- लखपती दीदी योजनेचे पात्रता
- लखपती दीदी योजनेचे फायदे
- लखपती दीदी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- लखपती दीदी योजनेची कार्यप्रणाली
- लखपती दीदी योजनेचा अर्ज कसा करावा
LAKHPATI DIDI YOJANA २०२४|लखपती दीदी योजनेचे उद्धिष्ट :
लखपती दीदी योजनेचे उद्धिष्ट हे खालीलप्रमाणे आहे .
ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करणे हे लखपती दीदी या योजनेचे मुख्य उधिष्ट आहे. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट केल्याने एकूणच ग्रामीण भागातील आर्थिक जीवनमान या योजनेमुळे सुधारणार आहे. छोट्या छोट्या बचत गटाच्या माधमातून महिला एकत्र येऊन उद्योग करणार या मुळे एकीची भावना तयार होऊन ग्रामीण भागातील उद्योग व्यवसायाला देखील चालना मिळेल.
LAKHPATI DIDI YOJANA २०२४|लखपती दीदी योजनेचे पात्रता :
- लखपती दीदी योजनेचे पात्रता आणि नियम हे खालीलप्रमाणे आहेत :
- अर्जदार हा भारत देशाचा नागरिक असणे बंधनकारक आहे.
- मुख्य म्हणजे अर्जदार महिला असणे गरजेचे आहे.
- पुरुष या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.
- अर्जदाराचे वय कमीत कमी १८ वर्ष आणि जास्तीत जास्त ५० वर्ष असावे.
- महिलांना बचत गटाशी संबंधीत असणे गरजेचे आहे.
- आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे गरजेचे आहेत.
LAKHPATI DIDI YOJANA २०२४ | लखपती दीदी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
लखपती दीदी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे असावीत:
- १. आधार कार्ड
- २.pancard
- ३. उत्पन्न दाखला
- ४.रहिवासी पुरावा
- ५.बँक खाते पुरावा
- ६. शैशनिक कागदपत्र
- ७. पासपोर्ट आकाराचे फोटो
- ८. नोंदणीकृत मो.नंबर
- ९.ई मेल
लेक लाडकी योजनेमुळे मुलींना मिळणार ८३००० रुपये .जाणून घ्या या योजने बद्दल.
LAKHPATI DIDI YOJANA २०२४ |लखपती दीदी योजनेचे फायदे
लखपती दीदी योजनेचे फायदे खालीलप्रमाणे आहेत :
- १. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चालू केलेल्या लखपती दीदी योजनेंतर्गत देशभरातील ग्रामीण भागातील २० लाख महिलांना कौशल्य वाढीचे प्रशिक्षण देण्यात येईल.
- २.निर्मला सीतारमण यांनी चालू आर्थिक वर्ष्याच्या आर्थिक संकल्प च्या भाषणात असे म्हटले कि या वर्षी लखपती दीदी योजनेची मर्यादा वाढवण्यात आली आहे.
- ३.देशभरातील ९ करोड महिला त्यांच्या ८३ लाख बचत गटाच्या माध्यमातून कसा या लखपती दीदी योजनेचा लाभ घेत आहेत. या महिला न कि केवळ स्वत:चा जीवनमान उंचावत आहेत परंतु इतरांना देखील याचा फायदा करून देत आहेत.
- ४.ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरण मुले एकूणच ग्रामीण भागातील आर्थिक स्थिती सुधारत आहे.
- ५.मागील वर्षीच्या जवळपास १ करोड लखपती दीदी ला या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
- ६. मागील वर्षी मिळालेल्या चांगल्या प्रतिसाद मुळे या वर्षी २ करोड ऐवजी ३ करोड लखपती दीदी चा संकल्प घेण्यात आला आहे.
- ७. ग्रामीण भागातील महिलांना काम आणि आर्थिक पाठबळ दिल्यामुळे ग्रामीण भागात राहून देखील ते त्यांचे जीवनमान उंचाऊ शकतात.
- ८. या योजनेमुळे ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांचे जीवनमन निश्चितच उंचावले आहे.
- ९. ग्रामीण भागातील ज्या महीलांना उद्योजक बनायचे आहे त्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी या योजनेंतर्गत मार्गदर्शन केले जाते.
- १०.या प्रशिक्षण मध्ये बचत आणि गुंतवणूक या गोष्टीची माहिती दिली जाते.
- ११.या योजनेंतर्गत महिलांना विमा कवच देखील दिले जाते. ज्यामुळे कुटुंबाची सुरक्षा वाढते .
- १२. उद्योग वाढीसाठी लागणारे लहान रक्कम चे कर्ज देखील या योजने मार्फत दिले जाते.
स्वाधार योजनेमुळे विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक ५१००० रुपये जाणून घ्या या योजनेबद्दल
LAKHPATI DIDI YOJANA २०२४ | लखपती दीदी योजनेची कार्यप्रणाली
लखपती दीदी योजनेची कार्यप्रणाली खालीलप्रमाणे आहे.
LAKHPATI DIDI YOJANA 2024 | लखपती दीदी योजना हि भारत देशाच्या केंद्र सरकार कडून राबवली जाते . ग्रामीण भागातील महिलांना पैसे ,ज्ञान आणि कौशल्य प्रदान करून त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी केंद्र सरकार कडून घेण्यात आलेले हे खूप चांगले प्रकारचे पाऊल आहे.
LAKHPATI DIDI YOJANA २०२४ | लखपती दीदी योजनेचा अर्ज कसा करावा
लखपती दीदी योजनेचा अर्ज कसा करावा या बद्दल माहिती खालीलप्रमाणे आहे:
लखपती दीदी योजनेचा अर्ज ऑफ लाईन पद्धतीने करता येणार आहे ,त्यासाठी सर्वप्रथम जिल्हाच्या ठिकाणी असणाऱ्या महिला व बाल कल्याण कार्यालयात जावे लागेल.
तिथून लखपती दीदी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
दिलेल्या अर्जात सर्व माहिती अचूक भरावी आणि सर्व संबंधित कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.
हा अर्ज त्याचं ठिकाणी जमा करावा लागेल आणि अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोच पावती घ्यावी.
अश्या प्रकारे लखपती दीदी योजनेचा अर्ज करता येईल.
लखपती दीदी योजनेचा अर्ज तुम्हाला जवळच्या आंगणवाडी सेविके कडे देखील मिळेल.
लखपती दीदी योजनेचे अर्ज प्रक्रिया व कार्यप्रणाली अगदी सहज आणि सोपी असल्याकारणाने ग्रामीण भागातील कुणीही महिला ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायची इच्छा आहे आणि ती कुठल्यातरी बचत गटाची सक्रीय सदस्य आहे अश्या महिलेला वर नमूद केलेले सर्व कागदपत्रे आणि अचूक भरलेला अर्ज तयार करून या योजनेचा लाभ घेता येईल हे नक्क्की.
लखपती दीदी योजनेसाठी GOVT. WEBSITE देखील चेक करू शकता.
LAKHPATI DIDI YOJANA २०२४ | लखपती दीदी योजने संदर्भातील FAQ:
लखपती दीदी योजना काय आहे?
भारत सरकार ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लखपती दीदी या योजनेची सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करणे हा या योजनेचा उद्देश्य आहे.
लखपती दीदी योजनेचा फायदा काय आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या या योजनेंतर्गत संपूर्ण देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या २० लाख महिलांना कौशल्य निर्माण चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
लखपती दीदी योजनेचे किमान पात्रता नियम काय आहेत?
ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहेत ती महिला चालू बचत गटाची सदस्य असणे गरजेचा आहे.
वाचक मित्रांनो , हि वेब साईट कुठल्याही शासकीय कार्यालयाशी संबंधित नाही.आम्ही येथे दिलेली माहिती हि विश्वासू वेब साईट वरून घेऊन सोप्या आणि सरळ भाषेत तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.