PM KISAN TRACTOR YOJANA 2024
PM KISAN TRACTOR YOJANA 2024 |प्रधानमंत्री किसान ट्रक्टर योजना २०२४ शेतीच्या मशागतीसाठी लागणारा पैसा आणि वेळ वाचावा या उद्देशाने सुरु केली गेली आहे. निसर्गाची वक्रदृष्टी आणि त्यात वाढणारे मजुरीचे दर हे शेतकऱ्यांचे ज्वलंत समस्या आहेत आणि या समस्या मधून शेतकर्यांना थोडा दिलासा देण्यासाठी म्हणून प्रधानमंत्री यांनी हि योजना सुरु केली आहे.
या योजनेंतर्गत शेतकर्यांना त्यांच्या जातीच्या प्रवर्ग नुसार जास्तीत जास्त ५० % पर्यंत अनुदान भारत सरकार कडून मिळेल. या लेखामध्ये आपण या योजनेचे सविस्तर माहिती, योजनेचे स्वरूप ,योजनेचे पात्रता निकष , आणि इतर माहिती जाणून घेणार आहोत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या योजनेमुळे शेतकर्यांना ५० % पर्यंत अनुदान मिळाल्यामुळे जे ट्रक्टर खरेदी करणे अवघड होते ते आता शक्य झाले आहे. आणि या मुळे शेतीची कामे करणे थोडे कमी श्रमिक होतील व मजुरी साठी लागणारा पैसा हा शेतकऱ्याच्या खिश्यात राहू शकतो.
PM KISAN TRACTOR YOJANA 2024 |प्रधानमंत्री किसान ट्रक्टर योजना २०२४ हि योजना प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूचे हित लक्षात घेऊन सुरु केली आहे. एकतर निसर्गाचा बिघडलेल्या समतोल मुळे पुरेसा प्रमाणात पाऊस न पडणे , अवकाळी पाऊस पडणे किंवा अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस पडणे या अश्या कारणामुळे शेतकर्याचे नुकसान होते .
या व्यतिरिक्त वाढत जाणारी मजुरी हा देखील शेतकऱ्यासाठी एक मोठा प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणात मजुरी देऊन पाहिजे तसे उत्पन्न न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. परंतु PM KISAN TRACTOR YOJANA 2024 |प्रधानमंत्री किसान ट्रक्टर योजना २०२४ या योजनेमुळे शेतकर्याची मजुरी साठी लागणारा खर्च खूप प्रमाणात कमी होईल व शेतकर्याचे शेती मधील कष्ट व वेळ दोन्ही पण वाचतील .
अश्या पद्धतीने शेतकर्याचे पैसा आणि वेळ दोन्हीची बचत करणारी अशी हि कल्याणकारी शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना PM KISAN TRACTOR YOJANA 2024 |प्रधानमंत्री किसान ट्रक्टर योजना २०२४ पंतप्रधान मोदी यांनी सुरु केली आहे. हि योजना जरी केद्र सरकारने चालू केली असेल तरी या साठीचा अर्ज हा राज्य सरकार कडे जमा करावा लागेल. भारत देशातील कुठल्याही राज्यातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि या कणा ला मजबूत करण्यासाठी भारत सरकार वेगवेगळ्या योजना ज्या कि शेतकऱ्याच्या हिताच्या असतील अश्या नेहमी घेऊन येत असते. त्या पैकी खाली काही नमूद केल्या आहेत.
- कुसुम सोलर योजना बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
- पी यम सूर्य घर योजना बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
- PM विश्वकर्मा योजना बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
शेतकरी जर चांगले उत्पन्न घेऊ शकला तर आपला कृषी विभाग बळकट होईल आणि जर कृषी विभाग बळकट झाला तर आपली अर्थव्यवस्था बळकट होईल, कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे.आणि आपली अर्थव्यवस्था शेती शिवाय चालूच शकत नाही.
आज च्या युगात शेती करताना यांत्रिक मदत खूपच गरजेची झाली आहे कारण त्या मुळे वेळ आणि पैसा दोघांची पण बचत होते. ट्रक्टर त्यापैकीच एक आहे.ट्रक्टर मुळे शेतीची बरीचशी कामे सोपी होतात. आज च्या काळात शेती करण्यासाठी ट्रक्टर हे आवशयक झाले आहे, परंतु ते घेणे सगळ्या शेतकर्यांना शक्य होत नाही आणि म्हणून मग त्यांना ट्रक्टर भाड्याने घ्यावा लागतो ज्या मुळे त्यांच्या खर्चात भर पडते. या समस्यांचा विचार करून मोदी सरकार ने हि योजना खास अश्या शेतकऱ्यांसाठी आणली आहे जे ट्रक्टर स्वखर्चाने घेऊ शकत नाहीत.
या योजनचे मान्य झालेले अनुदान हे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्या मध्ये जमा होणार आहे त्यामुळे अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी आपले बँकेत खाते चालू करणे गरजेचे आहे आणि या बँक खात्या ला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.
आपल्या देशातल्या शेतकरी इतके श्रीमंत नाहीत के ते स्वताच्या पैसे देऊन ट्रक्टर विकत घेऊ शकतील. परंतु वाढती लोकसंख्या साठी अन्नधन्य च्या गरजा पण वाढत जात आहेत. आणि या गरजांच्या पुरतेसाठी शेतकर्यांना आपली कामाची गती वाढविणे हि गरजेची आहे त्या साठी यंत्राची मदत अत्यावशक आहे. आणि असेच एक यंत्र आहे ट्रक्टर, हीच गरज ओळखून केंद्र सरकार ने हि योजना राबवली आहे.
PM KISAN TRACTOR YOJANA 2024 |प्रधानमंत्री किसान ट्रक्टर योजना २०२४ या योजनेबद्दल आपण खालीलप्रमाणे माहिती जाणून घेणार आहोत.
- योजनेचे उद्दिष्ट
- योजनेचे फायदे
- योजनेचे पात्रता आणि नियम
- योजनेचे कागदपत्रे
- योजनेसाठी अर्ज कसा करावा
- योजनेसाठी अर्ज कुठे करावा
PM KISAN TRACTOR YOJANA 2024 |प्रधानमंत्री किसान ट्रक्टर योजना २०२४ चे उद्दिष्ट
PM KISAN TRACTOR YOJANA 2024 |प्रधानमंत्री किसान ट्रक्टर योजना २०२४ चे उद्दिष्ट खालीलप्रमाणे आहेत.
भारत देशातील बहुतांश शेतकरी हे दारिद्य रेषेच्या खाली आहेत त्यामुळे शेती साठी ट्रक्टर खरेदी करणे त्यांना शक्य नाही. अश्या शेतकर्यांना या योजनेमुळे फायदा होईल.
या योजनेंतर्गत सरकार शेतकर्यांना ट्रक्टर किंवा त्या साठी लागणारी अवजारे खरेदी साठी २०-५० % पर्यंत अनुदान देणार आहे . अश्या योजनेमुळे शेतकर्यांचे उत्पन्न वाढीस चालना देखील मिळेल.शेतकर्यांना शेती संधर्भात येणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करून पंतप्रधान नरेंद मोदी यांनी हि योजना सुरु केली.
PM KISAN TRACTOR YOJANA 2024 |प्रधानमंत्री किसान ट्रक्टर योजना २०२४ चे फायदे
PM KISAN TRACTOR YOJANA 2024 |प्रधानमंत्री किसान ट्रक्टर योजना २०२४ चे फायदे खालीलप्रमाणे आहेत.
- या योजनेंतर्गत शेतकर्यांना ट्रक्टर किंवा ट्रक्टर संबंधित औजार खरेदी साठी २०% – ५० % पर्यंत अनुदान देणार आहेत. या अनुदान मुळे सर्वच शेतकर्यांना फायदा होणार आहे.
- या योजनेंतर्गत लाभ घेतल्यास इतर कोणत्याच योजनेंतर्गत कृषी यंत्र योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- एका कुटुंबातून फक्त एक व्यक्ती आणि कुठलेपण एक यांत्रिक योजनेचा लाभ घेता येईल.
- PM KISAN TRACTOR YOJANA 2024 |प्रधानमंत्री किसान ट्रक्टर योजना २०२४ योजनेंतर्गत देशांतील महिला शेतकर्यांना अधिक फायदा दिला जाईल.
- या योजनेसाठी शेतकर्याच्या नावावर शेतजमिनीचा ७/१२ असणे गरजेचे आहे.
- या योजनेंतर्गत अनुदान सोडून उर्वरित रक्कम साठी कर्ज सुविधा देखील उपलब्ध आहे.
PM KISAN TRACTOR YOJANA 2024 |प्रधानमंत्री किसान ट्रक्टर योजना साठी चे पात्रता नियम
PM KISAN TRACTOR YOJANA 2024 |प्रधानमंत्री किसान ट्रक्टर योजना ची नियम खालीप्रमाणे आहेत.
- अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
- अर्जदाराचे वय अर्ज करताना कमीर कमी १८ वर्ष आणि जास्तीत जास्त ६० वर्ष असावे.
- अर्जदाराच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न १.५ लाख रुपये पेक्षा कमी असावे.
- अर्जदाराची शेतजमीन हि स्वताच्या नावावर असावी.
- अर्जदार हा अल्पभूधारक असावा.
- या योजनेंतर्गत मिळालेले ट्रक्टर हे अन्य व्यक्ती च्या नावावर हस्तांतरणहोऊ शकत नाही.
- या योजने मध्ये अनुदान तर मिळणार आहेच त्या व्यतिरिक्त जी उर्वरित रक्कम अर्जदाराला भरायची आहे त्य रक्कम वर कर्ज सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
PM KISAN TRACTOR YOJANA 2024 |प्रधानमंत्री किसान ट्रक्टर योजना २०२४ योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
PM KISAN TRACTOR YOJANA 2024 |प्रधानमंत्री किसान ट्रक्टर योजना २०२४ योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.
- ७/१२ उतारा
- आधार कार्ड ची प्रत
- बँक खाते पासबुक आधार संलग्नित असलेले.
- जात प्रमाणपत्र ( अनु .जाती / अनु जमाती शेतकऱ्यांसाठी)
- ओळख प्रमाणपत्र (मतदान कार्ड / pancard / driving lisence / passport)
- मोबाईल नंबर
- हमीपत्र
- विहित नमुन्यातील अर्ज
PM KISAN TRACTOR YOJANA 2024 |प्रधानमंत्री किसान ट्रक्टर योजना २०२४ या योजनेसाठी अर्ज कसा करायचा
PM KISAN TRACTOR YOJANA 2024 |प्रधानमंत्री किसान ट्रक्टर योजना २०२४ योजनेसाठी अर्ज खालीलप्रमाणे करता येईल.
या योजनेंतर्गत ज्यांना अनुदान घेऊन ट्रक्टर घ्यायचा आहे या इच्छुक अर्जदारांना या योजनेसाठीचा अर्ज जवळच्या कृषी विभाग किंवा जनसेवा केद्रात मिळेल.
या योजनेंतर्गत २० % – ५० % पर्यंत अनुदान मिळेल.
कृषी विभागात किंवा जन सेवा केंद्रात गेल्यावर सर्वप्रथम अर्ज भरावा लागेल.
अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक,व्यवस्थित भरावी.
अर्ज भरून झाल्यावर एकदा नीट चेक करावा जसे कि नाव, पत्ता,जात इ .
अचूक भरलेल्या अर्जासोबत विचारलेली , गरजेची लागणारी सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
आणि हा संपूर्ण कागदपत्रांचा संच ( अर्ज आणि गरजेची कागदपत्रे जोडून ) कृषी केंद्रात किंवा जनसेवा केद्रात जमा करावा.
सर्वप्रथम शेतकर्यांनी online वेबसाईट वर जाऊन नोंदणी करावी.
online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अनुदानाचे प्रकार (२० HP) पर्यंत
इतर लाभार्थाना २५ % आणि अज/अजा /अल्प/महिला यांना ३५% पर्यंत अनुदान देण्यात येईल.
ट्रक्टर व इतर अवजारे करिता खालीलप्रमाणे अनुदान दिले जाईल.
१. ट्रक्टर – अज/अजा /अल्प/महिला यांना रुपये २,००,००० /- आणि इतर लाभार्थींना ७५,००० /- रुपये इतके अनुदान मिळेल.
२. नॅपसॅक /फुट पंप- अज/अजा /अल्प/महिला यांना रुपये ६०० तर इतर लाभार्थींना ५०० रुपये इतके.
३. पवार नॅपसॅक स्प्रयेर ( क्षमता ८-१० लिटर) अज/अजा /अल्प/महिला करिता ३१,००० /- तर इतर लाभार्थी साठी २५,०००/- रुपये इतके अनुदान मिळेल.
शेतकर्यांनी ONLINE अर्ज केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरील कागदपत्र सह अर्ज सदर करावा.
तालुका कृषी अधिकारी याच्याकडून पूर्व समंती मिळाली नंतर अवजारे खरेदी करावीत. मान्य अनुदान हे कृषी विभागामार्फत ONLINE पद्धतीने थेट लाभार्थीच्या बँक खात्या मध्ये जमा होईल.
सर्व वाचकांना सूचित करण्यात येते कि हि वेबसाईट भारत सरकार ची नाही किंवा त्याशी संबंधित देखील नाही. तरीपण कुठलाही निर्णय घेताना दिलेली माहिती एकदा पुन्हा तपासून बघावी. आम्ही फक्त योजनेबद्दल उपलब्ध असलेली माहिती आपल्या मराठी भाषेत आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो जेणे करून सामान्य शेतकरी पर्यंत हि माहिती पोहचावी.