PM SURYA GHAR YOJANA 2024|पंतप्रधान सूर्य घर योजना २०२४

PM SURYA GHAR YOJANA 2024

pradhanmantri surya ghar yojana

PM SURYA GHAR YOJANA 2024 (PM-SGMBY) ज्याला SOLAR ROOFTOP YOJANA असं पण म्हणतात त्याची पूर्ण माहिती मराठी मध्ये . आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी पंतप्रधान सूर्य घर योजना २०२४ |PM Surya Ghar yojana 2024 in marathi (PM-SGMBY) ची घोषणा केली. या योजनेचे मुख्य उधिष्ट हे जन सामान्य लोकांना अक्षय उर्जेचे ( Renewable Energy) चे महत्व पटून देणे आणि त्या अक्षय उर्जेचा लाभ घेता यावा म्हणून अनुदान (Subsidy) च्या मार्फत आर्थिक सहाय्य करणे असा आहे.

अक्षय उर्जेचा जास्तीत जास्त वापर घरगुती स्तरावर वाढवा आणि देशाच्या उर्जा विभागाला बळकटी मिळावी असा दुरोगामी विचार ठेऊन प्रधानमंत्री यांनी या योजनेची घोषणा मंत्रीमंडळआत केली.प्रधानमंत्री यांनी केलेल्या या घोषणेला केंद्रीय मंत्री मंडळाने देखील संमत्ती दिली आहे. या योजनेमुळे संपूर्ण देशभरात १ करोड परिवारांना लाभ मिळेल आणि या साठी ७५००० करोड रुपये चा अंदाजे खर्च येऊ शकतो. लाभार्थींना या योजनेमुळे ३०० युनिट फ्री वीज मिळेल.


पंतप्रधान नरेंद्र मोदि यांनी मोफत विजेसाठी छत सौरऊर्जा योजना PM Surya Ghar yojana 2024 सुरु केली आहे.या योजनेला “पंतप्रधान सूर्य घर योजना २०२४ ” असं नाव देण्यात आलंय .हि योजना मोडी सरकारच्या इतर रुफटोप सोलर योजनांपेक्षा वेगळी आहे, कशी ते जाणून घेऊया.केंद्र सरकारच्या ७५००० कोटींहून अधिकच्या या योजने चे उद्दिष्ट दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देऊन १ कोटी घरांना प्रकाश देण्याचे आहे.
या योजनेची सबसिडी थेट नागरिकांच्या बँक खात्यात जमा होईल या शिवाय मोठ्या प्रमाणात सवलतीचे बँक कर्जही मिळेल.

Rooftop सोलर चा videoबघा
Rooftop सोलरच्या पोर्टल चे उद्घाटन समारोह बघा

पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजना | PM Surya Ghar yojana 2024 चे फायदे:
पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजनेचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत

  • या योजनेमुळे देशातील १ करोड कुटुंबाना मोफत वीज मिळेल .
  • पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजना | PM Surya Ghar yojana 2024 योजनेंतर्गत ग्राहकांना प्रती महिना ३०० वीज युनिट मोफत मिळतील.
  • Rooftop solar विकत घेऊन आपल्या घरावर बसवण्यासाठी ग्राहकांना द्याव्या लागणाऱ्या रकमेवर सबसीडी देण्यात येईल.
  • या योजनेंतर्गत जर कुणाला Rooftop solar विकत घेण्यासाठी कर्ज हवे असेल तर केंद्र सरकार कडून या साठी मदत केली जाईल.
  • बँक लोन आणि सबसीडी दिल्या मुळे नागरिकांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक बोझा येणार नाही याची काळजी केंद्र सरकार ने घेतली आहे .
  • अक्षय उर्जा या पर्याय लोकांपर्यंत अगदी कमी खर्चात मिळेल.
  • वीज बिल मध्ये फायदा तर होईलच त्या सोबत नवीन रोजगार निर्मिती देखील होईल .
  • या योजनेमुळे पर्यावरण चे संतुलन देखील ठेवले जाईल.
  • कार्बन चे उत्सर्जन कमी होऊन वातावरणात OXYGEN चे प्रमाण वाढीस मदत होईल.
  • या योजनेमुळे हरित भारत देश घडवण्यासाठी मदत मिळेल तसेच देश उर्जा आत्मनिर्भर होण्यास पण चालना मिळेल.

पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजना | PM Surya Ghar yojana 2024 लागणारी पात्रता :
पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजना | PM Surya Ghar yojana साठी लागणारी पात्रता खालीलप्रमाणे असेल .

  • या योजनेसाठी जे कुणी अर्ज करणार आहेत ते भारताचे अधिकृत नागरिक असणे गरजेचे आहे.
  • या योजनेसाठी अर्जदार ने वयाचे १८ वर्ष पूर्ण केलेले पाहिजेत.
  • हि योजना मुख्य करून मिडल क्लास आणि लो क्लास इन्कम असणाऱ्या कुटुंबा साठी आहे.
  • जे कुटुंब जास्त इन्कम ग्रुप किंव्हा त्या पेक्षा जास्त उत्पन्न ग्रुप मध्ये येतात त्यांच्या साठी हि योजना नाही.
  • देशातील सर्व जाती धर्माचे लोक या पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजना | PM Surya Ghar yojana 2024 योजने साठी पात्र आहेत.
  • अर्जदार चे आधार कार्ड हे त्या अर्जदाराच्या बँक खात्या शी जोडलेले असावे.

पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजना | PM Surya Ghar yojana 2024 लागणारी कागदपत्रे:

पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजना | PM Surya Ghar yojana 2024 लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

  • आधारकार्ड
  • इलेक्ट्रिसिटी बिल
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
योजनेचा नाव पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजना
योजनेचे लाभार्थी भारत देशाचा नागरिक
योजनेचे उदीष्ट मोफत वीज देणे
मिळणारा लाभ ३०० युनिट फ्री वीज आणि सोलर युनिट लावणे
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑन लाईन पद्धतीने
अर्ज कुठे करावा येथे क्लिक करा
सबसीडी येथे क्लिक करा

पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजना | PM Surya Ghar yojana 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया :

पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजना | PM Surya Ghar yojana 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

  • वर दिलेल्या बटन वर क्लिक्क करा.
  • भारत सरकार ची अधिकृत वेबसाईट चे पेज ओपन होईल.
  • दिलेल्या भारत सरकार च्या अधिकृत वेबसाईट वर “Apply for Rooftop” या बटन वर क्लिक करा.
    *दिलेली नोंदणी प्रक्रिया (Registration process) पूर्ण करा.
  • नंतर अर्जाचा नमुना (Application form) ओपन होईल.
  • अर्जामध्ये विचारल्या गेलेल्या सर्व गोष्टी जसे कि मोबाईल नंबर ,इमेल आणि बाकी सर्व बाबी अचूक भराव्या.
  • आता तुमचा मोबाईल नंबर वापरून परत लोगिन करा.
  • आणि सोलर रूफटोप साठी अप्लाय करा.
  • केलेल्या अर्ज साठी मान्यता प्राप्त झाल्यावर साईट वर दिल्या गेलेल्या अधिकृत सोलर डीलर कडून तुमचा सोलर प्लांट लाऊन घ्या.
  • हे झाल्यानंतर तुमच्या प्लांट च्या डिटेल सबमिट करा आणि नेट मीटर साठी अप्लाय करा.
  • एकदा हे नेट मीटर बसवले गेले कि तुम्ही तुमचे कमिशन प्रमाणपत्र (commission certificate) पोर्टल वरून घेऊ शकतात.
  • कमिशन प्रमाणपत्र (commission certificate) चा रिपोर्ट मिळाला कि तुम्हाला तुमचा कॅन्सल चेक आणि बँक च्या डीटेल्स पोर्टल वर सबमिट कराव्या लागतील त्या नंतर ३० दिवसा पर्यंत तुमची सबसीडी बँक खात्या मध्ये जमा होईल.

पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजना | PM Surya Ghar yojana 2024 अर्ज कसा करावा :
अत्यंत सोपी कार्यप्रणाली चा वापर या अर्ज करण्या साठी देण्यात आला आहे.तुम्ही भारत सरकारच्या आदिकृत वेबसाईट जाऊन अर्ज करू शकता.

पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजना साठी अर्ज करा

पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजना | PM Surya Ghar yojana 2024 मिळणारी सबसीडी :

पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजना | PM Surya Ghar yojana 2024 या योजनेंतर्गत मिळणारी सबसीडी हि खालीलप्रमाणे आहे.
मुख्य म्हणजे हि योजना घरगुती वापर या श्रेणी साठी आहे. या साठी तुम्हाला तुमचे साधारण महिना भराचे येणारे वीज बिल माहित असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला किती क्षमतेचे सोलर लागेल याचा अंदाजा लावता येईल.

  • जर तुमचे एक महिन्याचे विजेचा वापर ०-१५० युनिट असा असेल तर तुम्हाला १-२ kw क्षमतेचे सोलर प्लांट लागू शकतो. आणि या साठी तुम्हाला भारत सरकार कडून ३०,००० – ६०,००० पर्यंत सबसीडी मिळू शकते.
  • जर तुमचे एक महिन्याचे विजेचा वापर १५०- ३०० युनिट असा असेल तर तुम्हाला २-३ kw क्षमतेचे सोलर प्लांट लागू शकतो. आणि या साठी तुम्हाला भारत सरकार कडून ६०,००० – ७८,००० पर्यंत सबसीडी मिळू शकते.
  • जर तुमचे एक महिन्याचे विजेचा वापर ३०० युनिट पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ३ kw क्षमतेचे किंवा त्या पेक्षा मोठा सोलर प्लांट लागू शकतो. आणि या साठी तुम्हाला भारत सरकार कडून ७८,००० पर्यंत सबसीडी मिळू शकते.
सबसीडी बद्दल अधिक जाणून घ्या
साधारण १ महिन्या चा विजेचा वापर (युनिट) सोलर प्लांट ची क्षमता दिली जाणारी सबसीडी
०-१५० १-२ kw ३०,००० – ६०,००००
१५०-३०० २-३ kw ६०,००० – ७८,०००
३०० पेक्षा जास्त ३ kw पेक्षा जास्त ७८,०००

FAQ:

१. पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजना काय आहे?

– हि योजना मध्यम आणि गरीब कुटुंबाना ३०० युनिट प्रती महिना फ्री वीज देणे आणि सोलर ROOFTOP द्वारा उत्पन्न वाढवण्यासाठी ची योजना आहे.

२. पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजनेमध्ये सबसीडी किती मिळणार आहे?

– ३०,००० रुपये प्रती kw भेटणार आहे ,जास्तीतजास्त ७८,०००० रुपये मिळणार आहेत.

३.पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजनेचा लाभ किती लोकांना भेटणार आहे ?

-प्राथमिक स्तरावर १ करोड लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नंतर याची मार्यदा वाढवणार आहेत.

४.पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजनेसाठी कर्ज कोठून मिळेल ?

-या योजनेसाठी सर्व राष्ट्रायीकृत बँक कडून कर्ज मिळू शकते.

५. पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजनेसाठी online प्रकारे अर्ज करता येऊ शकतो का?

-हो,या पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजनेसाठी online पद्धतीने अर्ज केले जाऊ शकतात.

६. पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजना कधी सुरु केली गेली आहे?

-पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजना १५ फेब्रुवारी २०२४ ला सुरु करण्यात आली आहे.

७. पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजनाचा लाभ कोण कोण घेऊ शकतो?

– योजनेचा लाभ भारत देशाचा कुठलाही नागरिक घेऊ शकतो पण त्या साठी काही आटी ठेवल्या आहेत.

८.पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजना कश्या संधर्भात आहे?

-पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजना हि फ्री वीज प्रदान करण्या विषयी आहे.

Disclaimer: This is not official website for PM SURYA GHAR YOJANA. We have just tried to give information in simple form about this yojana .The official website for PM surya ghar yojana is pmsuryaghar.gov.in