SANJAY GANDHI NIRADHAR YOJANA 2024
SANJAY GANDHI NIRADHAR YOJANA 2024 या योजनेंतर्गत ६५ वर्षावरील निराधार पुरुष व महिलांना १५०० रुपये महिना इतकी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल. महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षावरील निराधार पुरुष व महिलांना महाराष्ट्र शासना तर्फे १५०० रुपये प्रती महिना अशी आर्थिक मदत केली जाणार आहे. जर एकाच कुटुंबातील एका पेक्षा जास्त अर्जदार असतील तर त्यांना हि रक्कम कमी करून १२०० रुपये प्रती व्यक्ती अशी मदत म्हणून दिली जाणार आहे. निराधार लोकांना त्यांच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी कुणावर अवलंबून राहण्याची गरज पडू नये असा या योजनेमागील सरकारचा उद्देश आहे.
संजय गांधी निराधार योजना २०२४ बद्दल आपण खालीलप्रमाणे माहिती घेणार आहोत.
संजय गांधी निराधार योजना चे उद्दिष्ठ
संजय गांधी निराधार योजना चे वैशिष्ठ
संजय गांधी निराधार योजना पात्रता
संजय गांधी निराधार योजना चे फायदे
संजय गांधी निराधार योजना चे अटी
संजय गांधी निराधार योजना साठी लागणारे कागदपत्रे
संजय गांधी निराधार योजना अर्ज रद्द होण्याची कारणे.
संजय गांधी निराधार योजना चे अर्ज करण्याची पध्दत
संजय गांधी निराधार योजना चे उद्दिष्ठ
संजय गांधी निराधार योजना चे उद्दिष्ठ खालीलप्रमाणे आहेत.
- महाराष्ट्र राज्यातील निराधार लोकांना आर्थिक मदत करून त्यांना मुलभूत गरजा भागवण्यासाठी सहाय्य करणे.
- निराधार लोकांचे जीवनमान सुधारणे.
- संजय गांधी निराधार योजना अतंर्गत राज्यातील निराधार लोकांचे सामाजिक व आर्थिक विकास साधणे .
- राज्यातील निराधार लोकांना सशक्त तसेच आत्मनिर्भर बनविणे.
- महाराष्ट्र राज्यातील निराधार लोकांना त्यांच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी कुणावरही अवलंबून राहावे लागू नये किंवा कुणाकडूनही उसने/उधार किंवा व्याजाने पैसे मागण्यची वेळ येऊ नये अश्या उद्दात्त विचार ठेऊन संजय गांधी निराधार योजना ची सुरुवात करण्यात आली आहे.
- महाराष्ट्र राज्यातील निराधार लोकांना समाजात आत्मसन्मानाने जगता यावे असा यामागचा विचार आहे.
संजय गांधी निराधार योजना चे वैशिष्ठ
संजय गांधी निराधार योजना चे वैशिष्ठ खालीलप्रमाणे आहेत.
- संजय गांधी निराधार योजना हि योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यातील निराधार लोकांसाठी सुरु करण्यात आली आहे.
- संजय गांधी निराधार योजना या योजनेचा लाभ स्री आणि पुरुष असा दोघानापण घेता येणार आहे.
- महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीला जि इतर निकष वर पात्र आहे त्याला या योजनेचा लाभ घेता येईल.
- या योजनेंतर्गत कारायचा अर्ज हा अत्यंत सोपा असा आहे.
- या योजनेंतर्गत दिले जाणारे अनुदान हे सरळ लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये DBT द्वारा जमा करण्यात येईल.
- राज्यातील निराधार व्यक्तींचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यासाठी व त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास घडवण्यासाठी सदर योजना महत्वाची आहे.
- एखाद्या दाम्पत्याला जर एकाच मुलगी असेल आणि तिचे जर लग्न झाले तर त्या मुलीच्या आई वडिलांना या योजनेंतर्गत अनुदानाचा लाभ मिळेल.
संजय गांधी निराधार योजना पात्रता
संजय गांधी निराधार योजना पात्रता खालीलप्रमाणे आहेत.
- अपंगतील अस्थिव्यंग ,कर्णबधीर,मुकबधीर,मतीमंध या प्रवर्गातील स्री – पुरुष या योजनेसाठी पात्र असतील.
- १८ वर्षा खालील अनाथ मुले
- निराधार महिला,निराधार विधवा, शेतमजूर महिला
- आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी.
- दुर्धर आजार जसे कि क्षयरोग ,कर्करोग ,एडस ,कुष्टरोग या सारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे महिला व पुरुष.
- घटस्पोट ची केस चालू असणारी महिला किंवा घटस्पोट झाल्यावर पोटगी न मिळालेली महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.
- अत्याचारित महिला.
- वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला.
- तृतीयपंथी
- ३५ वर्षाखालील अविवाहित स्री
- कुठल्याही शिक्षेच्या अतंर्गत तुरुंगात् शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची विवाहित पत्नी द्सेखील या योजनेचा लाभ घेऊ शकते.
संजय गांधी निराधार योजना चे फायदे
संजय गांधी निराधार योजना चे फायदे खालीलप्रमाणे आहेत
- संजय गांधी निराधार योजना अतंर्गत लाभार्थीला दर महिन्याला १५०० रुपये इतके मानधन आर्थिक मदत स्वरुपात मिळेल.
- या मुळे त्या निराधार व्यक्तीचा सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यासाठी मदत होईल.
- या योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील एका पेक्षा जास्त व्यक्ती लाभार्थी असतील तर त्यांना १५०० ऐवजी १२०० रुपये प्रती व्यक्ती इतके अनुदान मदत स्वरुपात देण्यात येईल.
- राज्यातील निराधार व्यक्ती सशक्त आणि आत्मनिर्भर बनतील.
- महाराष्ट्र राज्यतील निराधार व्यक्तींचे जीवनमान सुधारेल.
- निराधार म्हणून जीवन व्यतीत करत असताना त्यांना त्यांच्या मुलभूत गरजांसाठी इतर कुणावरही अवलंबून राहू लागू नये,तसेच त्यांना कुणाकडूनही उधार ,उसने पैसे मागण्याची वेळ येऊ नये या साठी या योजनेचा लाभ होणार आहे.
- कुठल्याही आर्थिक अडचणी शिवाय निराधार लोकांना त्यांचे जीवन जगता यावे या साठी या योजनेचा लाभ होईल.
संजय गांधी निराधार योजना चे अटी
संजय गांधी निराधार योजना चे अटी खालीलप्रमाणे आहेत.
- संजय गांधी निराधार योजनेचा ज्याला लाभ घ्यायचा आहे तो अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- ज्याला यज योजनेचा अर्ज करायचा आहे त्याचे वय ६५ वर्ष पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदाराकडे उत्पन्नाचे इतर कुठलेही साधन नसावे.
- अर्जदाराकडे स्व:ताची मालकीची जमीन नसावी.
- जर अर्जदाराचे वय ६५ वर्ष पेक्षा जास्त असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार किमान १५ वर्षापासून महारष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराचे कुटुंब हे दारिद्य्र रेषेखालील यादी मध्ये असणे गरजेचे आहे.
- लाभार्थ्याच्या कुटुंबांचे उत्पन २१,००० पेक्षा कमी असावे.
- अस्थिव्यंग,कर्णबधीर,मुकबधीर,मतीमंद यांचे अपंगत्व बाबत अधिनियम १९९५ मधील तरतुदीप्रमाणे निर्णय होईल. या योजनेचा लाभ किमान ४०% अपंगत्व असलेल्या व्यक्तीस घेता येईल फक्त. या साठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमान्पत्रक बंधनकारक आहे.
- ज्या मुला मुलींचे आई वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ झालेले मुले व अनाथ अश्राम मध्ये न राहत असलेले मुले या योजनेसाठी पात्र असतील. आई वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ झाल्याबद्दल चे प्रमाणपत्र तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून घेणे गरजेचे असेल , आणि संबंधित बाल विकास अधिकारी यांचे देखिल प्रमाणपत्र आवश्यक असेल.
- अनाथ मुलामुलींना दिले जाणारे अनुदान हे मुलेमुली सद्यान होईपर्यंत त्यांच्या पालकांना देण्यात येईल.
- विधवा स्री ला ग्राम पंचायातीमधून पतीच्या मृत्यू दाखला घेऊन तो सदर करणे गरजेचे असेल, अश्या विधवा महिलेला या योजनेंतर्गत लाभ देण्यात येईल.
- महाराष्ट्र शासनाच्या किंवा भारत सरकारच्या अन्य कुठल्याही योजनेंतर्गत जर लाभार्थीला मासिक पेन्शन चा लाभ मिळत असेल तर त्या लाभार्थ्याला या योजनेंतर्गत कुठलाही लाभ मिळणार नाही.
- संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी जर मरण पावला तर त्याला दिले जाणारे अर्थसहाय्य लगेच थाबवण्यात येईल. मृत्यू समयी जर त्या लाभार्थ्या ला काही थकबाकी ची रक्कम देय असेल तर ती रक्कम त्याच्या पत्नीला किंवा तिच्या पतीला किंवा योग्य त्या वारसदाराला देण्यात येईल.
- १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीमध्ये दरवर्षी लाभार्त्यला स्वतः बँक मनेजर किंवा पोस्ट मास्तर कडे हजर राहणे गरजेचे आहे व ते लाभार्थी हयात असल्याची नोंद करतील.
- जर लाभार्थी बँक मनेजर किंवा पोस्ट मास्तर कडे हजर राहू शकला नाही तर त्याने नायब तहसीलदार किंवा प्रांत अधिकारी यांच्या कडे हजार राहून ह्यात असल्याचा दाखला सदर करावा लागेल.जर हयात असल्याचा दाखला सदर केला गेला नाही तर लाभार्थ्याला १ एप्रिल पासून या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- लाभार्थीची दर वर्षी पात्रता पडताळून बगितली जाईल जर कुठल्याही कारणास्तव लाभार्थी पात्र नाही असे आढळून आले तर त्या लाभार्त्याला ते कारण कळवले जाईल व त्याला मिळणारे अनुदान थाब्वण्यात येईल.
संजय गांधी निराधार योजना अतंर्गत सामाविष्ट्य प्रवर्ग
संजय गांधी निराधार योजना अतंर्गत सामाविष्ट्य प्रवर्ग या खालीलप्रमाणे आहेत.
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- विमुक्त जाती
- भटक्या जमाती
- विशेष मागासवर्ग
- इतर मागासवर्ग
- खुला गट
निराधार प्रवर्गामध्ये खालीलप्रकारे लोक देखील समाविष्ट असतील.
- अंध
- अस्थिव्यंग
- मुकबधीर
- कर्णबधीर
- मतीमंद
खालिलप्रकारे आजार असलेले लोक देखील या योजनेमध्ये समाविष्ट असतील.
- क्षयरोग
- पक्षघात
- कर्करोग
- कुष्टरोग
- एडस
- इतर दुर्लभ आजार
खालील प्रवर्गातील महिला देखील या योजनेसाठी पात्र असतील.
- शेतमजूर महिला
- निराधार महिला
- घटस्पोट प्रक्रियेतील महिला
- घटस्पोटीत परंतु पोटगी न मिळालेली महिला
- अत्याचारित महिला
- वेश्याव्यवसाय मधून मुक्त झालेली महिला
संजय गांधी निराधार योजना साठी लागणारे कागदपत्रे
संजय गांधी निराधार योजना साठी लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.
- ओळख पुरावा ( खालीलपैकी कुठलेही एक ) – pan card / आधार कार्ड /मतदान ओळखपत्र /वाहन चालक परवाना /निमशासकीय ओळखपत्र
- पत्त्याचा /रहिवासी पुरावा– ग्रामसेवक किंवा तलाठी यांनी दिलेला रहिवासी असल्या बाबतचा रहिवासी दाखला.
- वयाचा पुरावा
- उत्पन्नाचा पुरावा
- अपंगाचे प्रमाणपत्र
- अनाथ असल्याचा प्रमाणपत्र
- महिला घटस्पोटीत असल्यास घट स्पोटाचा न्यायालयीन पत्र
- विधवा असल्यास पतीच्या निधनाचे मृत्यू प्रमाणपत्र
संजय गांधी निराधार योजना अर्ज रद्द होण्याची कारणे.
संजय गांधी निराधार योजना अर्ज रद्द होण्याची कारणे खलिलप्रमाणे आहेत.
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मुळ रहिवासी नसल्यास त्याचा अर्ज रद्द केला जाईल .
अर्जदाराचे वय ६५ वर्षा पेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल .
अर्जदाराकडे इतर उत्त्पनाचे साधन असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
अर्जदार आर्थिकदृष्ट्या गरीब नसल्यास अर्ज रद्द केला जाईल .
अर्जदाराचे कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न २१००० रुपये पेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल .
अर्जदाराने अर्जामध्ये खोटी माहिती भरली आहे असे निदर्शनास येऊन जर ते सिद्ध झाले तर अर्ज रद्द केला जाईल .
संजय गांधी निराधार योजना चे अर्ज करण्याची पध्दत
संजय गांधी निराधार योजना चे अर्ज करण्याची online आणि offline अश्या दोन्ही पद्दतीने करता येतात.
संजय गांधी निराधार योजना चे अर्ज करण्याची online पद्धत खालीलप्रमाणे आहे .
सर्व प्रथम अर्जदाराला शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर new user वर क्लिक करून विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
सर्व माहिती अचूक भरल्यानंतर अर्जदाराला अर्ज करण्यासाठी २ पर्याय मिलेल .
कुठलाही एक पर्याय निवडून अर्जदार अर्ज करू शकतो.
संजय गांधी निराधार योजना चे अर्ज करण्याची offline पद्धत खालीलप्रमाणे आहे .
संजय गांधी निराधार योजना चा offline अर्ज करण्यासाठी अर्जदाराला तो राहत असलेल्या ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसीलदार/ जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन संजय गांधी निराधार योजना चा अर्ज घ्यावा लागेल त्यात विचारलेली सर्व माहिती अचूक भरू देऊन आवश्यक त्या सर्व कागदपत्र सोबत तो अर्ज त्या कार्यालयात जमा करावा लागेल.
आता महिलांना स्वयंपाक घरातील त्रास होणार कमी आणि पैशाची पण बचत होणार.
सुशिक्षित बेरोजगार आहात का? सरकार तुम्हाला देणार महिना ५००० रुपये भत्ता.
घर बांधकामासाठी शासन देणार १.३० लाख रुपये इतके अनुदान. जानून घ्या तुम्हाला मिळतील का?
राज्यातील गरीब विधवांना मिळणार दर महिन्याला पेन्शन . किती आणि कसा बघा.
गरोदर महिलांसाठी खुश खबर! ,मिळणार अनुदान . कसे ते बघा.
तरुणपणी कमवा आणि म्हातारपणात मिळवा खात्रीपूर्वक पेन्शन
शेती मशागती साठी विकत घ्या ट्रक्टर ,सरकार देणार भरभरून आर्थिक अनुदान.
सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.
सर्व वाचकांना एक विनंती हि वेब साईट केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाही किंवा त्या संबंधी देखील नाही. जर आपण वर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे या योजनेबद्दल काही निर्णय घेणार असणार तर कृपया वर दिलेली माहिती परत एकदा पडताळून बघा आणि मगच हवा तो निर्णय घ्यावा. आम्ही फक्त या योजनेची माहिती आपल्या मराठी वाचकांना आपल्या मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या उद्देशाने हा प्रयत्न केला आहे. कृपया याची नोंद घ्यवी.
जर आपण आमच्या या लेखाबद्दल किंवा आमच्या वेबसाईट बद्दल जर काही अभिप्राय देऊ इच्छित असणार तर कृपया आम्हाला abhimanmaarathi@gmail.com या मेल आयडी लिहून कळवावा.
धन्यवाद.