SHABARI GHARKUL YOJANA 2024
SHABARI GHARKUL YOJANA 2024 महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील सामान्य जनतेसाठी नेहमी नवनवीन कल्याणकारी योजना राबवीत असते.अशीच एक नवीन योजना महारष्ट्र सरकार ने आणली आहे त्याचे नाव – शबरी आदिवासी घरकुल योजना २०२४.
राज्यातील अनुसूचित जमातीमधील लोकांना राहण्यासाठी घरांची कमतरता आहे. त्यात अनुसूचित जमातीमधील लोकांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्या कारणाने त्यांना घरे बांधकाम करणे अवघड आहे. अनुसूचित जमातीमधील लोकांना त्यांच्या मुलभूत गरजा जसे कि अन्न,वस्र आणि निवारा हे मिळवणे अवघड होऊन जाते.अश्या परिस्थितीत या लोकांना कच्च्या घरात किंवा झोपडी मध्ये राहावे लागते . या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शबरी आदिवासी घरकुल योजना २०२४ या योजनेची घोषणा केली आहे.
आपण या लेखामध्ये शबरी आदिवासी योजना २०२४ या योजनेबद्दल खालिलप्रकारे माहिती घेणार आहोत.
- शबरी घरकुल योजनेबद्दल थोडक्यात
- शबरी घरकुल योजनेचे उद्देश
- शबरी घरकुल योजनेचे फायदे
- शबरी घरकुल योजनेचे वैशिष्ट्ये
- शबरी घरकुल योजनेचे पात्रता
- शबरी घरकुल योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- शबरी घरकुल योजने च्या अटी
- शबरी घरकुल योजनेची अर्ज प्रक्रिया
शबरी घरकुल योजनेची सखोल माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा .
शबरी घरकुल योजना बद्दल थोडक्यात
महाराष्ट्र राज्यातील बरयाचश्या अनुसूचित जमातीच्या लोकांना राहण्यासाठी पक्की अशी घरे नाहीत हे लोक निवारा म्हणून एकतर कुड्याच्या झोपडया मध्ये राहतात किंवा कच्च्या घरांमध्ये राहतात . अश्या घरामंध्ये राहिल्यामुळे अनुसूचित जमातीच्या लोकांना बदलत्या कृतू मानानुसार कधी पाऊस कधी थंडी तर कधी उन्हाचा सामना करावा लागतो. या सगळ्या समस्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकारने शबरी आदिवासी घरकुल योजना २०२४ ची सुरुवात केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात हि तरतूद लक्षात घेऊन सरकार ने एकूण १,०७,०९९ इतकी घरे अनुसूचित जमातीच्या लोकांना देण्याचे नियोजित केले आहे.या योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लोकांना २६९ चौ.फु .क्षेत्रफळ असलेले पक्के घरकुल दिले जाईल.
या बरोबरच स्वच्छ भारत अभियान अतंर्गत शौचालय बांधकामासाठी वेगळे १२,००० रुपये अनुदान दिले जाईल.घर बांधकाम करताना लाभार्थींना काही बदल करायचे असल्यास ते करू शकतात परंतु घर बांधकामासाठी जी अनुदान रक्कम म्हणून देण्यात येईल त्या मध्ये काहीही वाढ करून दिली जाणार नाही. जर खर्चामध्ये काही वाढ होत असेल तर ती वाढलेली रक्कम लाभार्थी ला भरावी लागेल.
अनुसूचित जमातीच्या लोकांचे २०११ साली झालेल्या सर्वेषण नुसार शबरी घरकुल योजना साठी पारधी समाजातील समुदाय ,आदिवासी जमाती पात्र असतील. अर्ज जमा केल्यानंतर योजनेसाठी पात्रता ठरवताना प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतरच लाभार्थीची निवड केली जाईल.तसेच लाभार्थीची निवड करताना ग्रामसभा ,पंचायत समिती,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत लाभार्थीची निवड करून अनुदान मंजुरी दिली जाईल आणि मंजूर झालेले अनुदान लाभार्थीच्या आदर कार्ड संलग्नित बँक खात्या मध्ये सरळ जमा केले जाईल.
शबरी घरकुल योजना चा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे शहरी भागातील वार्षिक उत्पन्न १.२० लाख पेक्षा जास्त नसावे तर ग्रामीण भागात १.०० लाख रुपये पेक्षा जास्त नसावे. शबरी घरकुल योजना अतंर्गत महाराष्ट्र राज्यात २०२४ साठी १८५४४ घरे उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.
योजनेचे नाव | शबरी आदिवासी घरकुल योजना |
योजनेचे लाभार्थी | अनुसूचित जमातीमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असे कुटुंब |
योजनेचा उद्देश | पक्के घर बांधून देणे |
योजनेचा लाभ | अनुसूचित जमातीमधील लोकांना पक्के घरकुल बांधून देणे |
विभाग | आदिवासी विकास विभाग |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
योजनेचे नियोजन आणि नियंत्रण कुणाचे | महाराष्ट्र सरकार |
शबरी घरकुल योजना चे उद्देश
शबरी घरकुल योजनेचे उद्देश हे खालीप्रमाणे आहे.
- महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनुसूचित जमातीमधील कटुंब मातीच्या किंवा कच्च्या घरांमध्ये राहतात अश्या अनुसूचित जमातीमधील कुटुंबाना राहण्यासाठी पक्के घरे देणे हे शबरी आदिवासी घरकुल योजना २०२४ चे मुख्य उद्देश आहे.
- आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांचे राहणीमान आणि जीवनमान उंचावणे .
- गरीब कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक विकास साधने.
- पक्के घरे बांधण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनुसूचित जमातीमधील कुटुंबाना पक्के घरे बांधण्यासाठी कुणाकडून उधार किंवा व्याजाने पैसे घेनाची गरज भासु नये.
- दारिद्य रेषेखालील कुटुंबाना पक्के घरे बांधून देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहासोबत जोडणे.
- दारिद्य रेषेखालील कुटुंबाना पक्के घरे बांधण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- महाराष्ट्र राज्यामधील ग्रामीण भागाचा विकास करणे.
शबरी घरकुल योजना चे फायदे
शबरी आदिवासी घरकुल योजनेचे फायदे खालीप्रमाणे आहेत.
- आर्थिक परिस्थिती नसताना देखील आदिवासी ,आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनुसूचित जमातीमधील कुटुंबाना स्वतःचे असे पक्के घर मिळतील.
- अनुसूचित जमातीमधील असले तरी पक्के घर असल्यमुळे समाजाच्या मुख्य प्रवाहात असल्यची भावना त्यांच्यात जागृत करणे .
- पक्के घरे झाल्यामुळे बदलत्या वातावरणामुळे म्हणजे कधी पाऊस,कधी उन तर कधी थंडी अश्या त्रासापासून त्यांचे संरक्षण होईल.
- या योजनेंतर्गत पक्के घरे बांधण्यासाठी २ लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे.
- शबरी आदिवासी घरकुल योजना मध्ये घर बांधकाम मध्ये सौचालाय बांधण्यासाठी १२,००० रुपये इतके वेगळे अनुदान मिळेल.
- मनरेगा योजनेंतर्गत लाभार्थीस ९० दिवसाचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो .
- गरीब कुटुंबाचा या योजनेंतर्गत सामाजिक व आर्थिक असा दोन्ही बाजूने विकास केला जाईल.
शबरी घरकुल योजना चे वैशिष्ट्ये
शबरी घरकुल योजनेचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
- महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरीब अनुसूचित जमातीमधील लोकांसाठी हि योजना सुरु केली आहे.
- शबरी घरकुल योजना हि योजना समाजातील अनुसूचित जमातीमधील ज्यांना राहण्यासाठी घरे नाहीत अश्या कुटुंबांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी तसेच सशक्त बनवण्यासाठी फायदेशीर ठरेल.
- या योजनेंतर्गत सौचालाय बांधण्यासाठी वेगळे १२,००० रुपये इतके अनुदान मिळणार आहे.
- या योजनेंतर्गत मिळणारे अनुदान रक्कम हि सरळ लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
- या योजनेमध्ये अपंग व्यक्तीच्या कुटुंबाला ५ % इतके आरक्षण मिळणार आहे.
- ग्रामीण भागाचा विकास या योजनेमुळे सुलभ होईल.
एक महत्वाची सूचना :
” राज्यातील जे कुटुंब बाकी सर्व पात्रता पास होत आहेत परंतु ज्या कुटुंबाकडे स्वतःची मालकीची जमीन नाही अश्या कुटुंबाना राज्य सरकार पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत ५०,००० रुपये किंवा जमानीची वास्तविक किंमत या पैकी जि कमी असेल ती रक्कम या योजनेंतर्गत त्या कुटुंबाला दिली जाईल. जेणेकरून ज्यांच्या आकडे जमीन नाही ते पण जमीन विकत घेऊन त्यावर आपले हक्काचे घर बंधू शकतात.”
शबरी आदिवासी घरकुल योजना २०२४ ची पात्रता
- शबरी आदिवासी घरकुल योजना २०२४ ची पात्रता खालीलप्रमाणे आहेत.
- अर्जदार हा मुळचा महाराष्ट्र राज्यातील कायम निवासी असणे गरजेचे आहे.
- राज्यातील अनुसूचित जमातीमधील कुटुंब या शबरी आदिवासी घरकुल योजना २०२४ योजनेसाठी पात्र असतील.
- शहरी भागातील अनुसूचित जमातीमधील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.२० लाख पेक्षा जास्त नसावे
- तर ग्रामीण भागातील अनुसूचित जमातीमधील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.०० लाख पेक्षा जास्त नसावे.
शबरी घरकुल योजना साठी लागणारी कागदपत्रे
शबरी घरकुल योजनेसाठी लागणारी कागदपत्रे हि खालीलप्रमाणे आहेत.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- वयाचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- दिव्यांग / अपंग असल्यास ते प्रमाणपत्र
- ७/१२ उतारा तसेच ८ अ दाखला
- मालमत्ता कर भरल्याची पावती
- ग्राम पंचायत न हरकत प्रमाणपत्र
- बँक खात्याचा तपशील
- पास पोर्ट आकाराचे फोटो
- मोबाईल नंबर
- ई मेल आयडी
शबरी घरकुल योजना च्या अटी
शबरी घरकुल योजने च्या अटी खालीलप्रमाणे आहेत.
- अर्जदाराचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्यातील असावे तरच या योजनेचा लाभ दिला जाईल.महाराष्ट्र बाहेरील कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- अर्जदार अनुसूचित जमातीमधील असणे जरुरी आहे.दुसऱ्या प्रवर्गातील लोकांना या योजनेंतर्गत लाभ मिळणार नाही.
- अर्जदार हा किमान १५ वर्ष महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
- अर्जदाराचे किंवा त्याच्या कुटुंबाचे स्वतःच्या मालकीचे घर नसावे.
- घर बंध्ण्य्साठी स्वतःच्या मालकीची किंवा सरकाने दिलेली जमीन असावी.
- शहरी भागातील अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.२० लाख किंवा ग्रामीण भागातील अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.०० लाख पेक्षा जास्त नसावे.
आता महिलांना स्वयंपाक घरातील त्रास होणार कमी आणि पैशाची पण बचत होणार.
सुशिक्षित बेरोजगार आहात का? सरकार तुम्हाला देणार महिना ५००० रुपये भत्ता.
घर बांधकामासाठी शासन देणार १.३० लाख रुपये इतके अनुदान. जानून घ्या तुम्हाला मिळतील का?
राज्यातील गरीब विधवांना मिळणार दर महिन्याला पेन्शन . किती आणि कसा बघा.
गरोदर महिलांसाठी खुश खबर! ,मिळणार अनुदान . कसे ते बघा.
तरुणपणी कमवा आणि म्हातारपणात मिळवा खात्रीपूर्वक पेन्शन
शेती मशागती साठी विकत घ्या ट्रक्टर ,सरकार देणार भरभरून आर्थिक अनुदान.
शबरी घरकुल योजना ची अर्ज प्रक्रिया
शबरी घरकुल योजनेची अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
शबरी घरकुल योजना हि शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांसाठी आहे .
शहरी भागातील अर्जदारांनी सर्वप्रथम महानगरपालिका किंवा नगरपालिका या ठिकणी कार्यालयात जाऊन शबरी घरकुल योजने अर्ज घेणे गरजेचे आहे.
अर्ज घेतल्यानंतर अर्जामध्ये विचारली गेलेली सर्व माहिती अचूक भरून आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडून हा अर्ज महानगरपालिका मधील आदिवासी विकास प्रकल्प संबंधित अधिकारी यांच्या कडे जमा करावा.
ग्रामीण भागातील अर्जदारांनी ग्रामपंचायत कार्यालात जाऊन किंवा जिल्हा कार्यालयात जाऊन शबरी घरकुल योजने अर्ज घेणे गरजेचे आहे.
अर्ज घेतल्यानंतर अर्जामध्ये विचारली गेलेली सर्व माहिती अचूक भरून आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडून हा अर्ज कार्यालयातील आदिवासी विकास प्रकल्प संबंधित अधिकारी यांच्या कडे जमा करावा.
शबरी घरकुल योजनेंतर्गत ग्रामीण क्षेत्रामध्ये १.३२ लाख,डोंगराळ भागात १.४२ लाख,नगर परिषद क्षेत्रामध्ये १.५० लाख,आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये २.०० लाख इतके अनुदान मिळते याशिवाय सौचालाय बांधकामासाठी वेगळे १२,००० रुपये मिळतात.
शबरी घरकुल योजना २०२४ ची अंमलबजावणी प्रक्रिया
- लाभार्थीची निवड झाल्यानंतर सर्वप्रथम त्याच्या घराचे जिओ tag आणि जॉब कार्ड maping केले जाते.
- निधी वितरीत करण्यासाठी लाभार्थीचे बँक खाते आधार कार्ड शी संलग्नित असणे गरजेचे आहे, मिळणारा अनुदान हे DBT द्वारे सरळ लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.
- घर बांधणीच्या प्रत्येक टप्यावर बांधकामाचा भौतिक प्रगतीचा आढावा घेऊन २ रा ,३ रा अश्या टप्प्यामध्ये हे अनुदान DBT द्वारे लाभार्थीच्या बँक खात्य्मध्ये जमा केला जाईल.
- कुठल्याही ठेकेदाराचा यामध्ये सहभाग असणार नाही.
- मनरेगा मार्फत लाभार्थीला ९० दिवसाचा रोजगार १८,००० रु. वेगळा दिला जातो .
शबरी आदिवासी घरकुल योजनेचा अर्जा साठी इथे क्लिक करा.
सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.
सर्व वाचकांना एक विनंती हि वेब साईट केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाही किंवा त्या संबंधी देखील नाही. जर आपण वर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे या योजनेबद्दल काही निर्णय घेणार असणार तर कृपया वर दिलेली माहिती परत एकदा पडताळून बघा आणि मगच हवा तो निर्णय घ्यावा. आम्ही फक्त या योजनेची माहिती आपल्या मराठी वाचकांना आपल्या मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या उद्देशाने हा प्रयत्न केला आहे. कृपया याची नोंद घ्यवी.
जर आपण आमच्या या लेखाबद्दल किंवा आमच्या वेबसाईट बद्दल जर काही अभिप्राय देऊ इच्छित असणार तर कृपया आम्हाला abhimanmaarathi@gmail.com या मेल आयडी लिहून कळवावा.
धन्यवाद.