VIDHWA PENSION YOJANA 2024|विधवा पेन्शन योजना २०२४ महाराष्ट्र

VIDHWA PENSION YOJANA 2024

VIDHWA PENSION YOJANA 2024

VIDHWA PENSION YOJANA 2024|विधवा पेन्शन योजना २०२४ महाराष्ट्र हि योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रवर्गातील गरीब विधवा महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे. हि योजना महाराष्ट्र सरकार ने २०२२ पासून सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकार महिलांसाठी नेहमी चांगल्या कल्याणकारी योजना घेऊन येत असते , त्यापैकीच विधवा पेन्शन योजना हि एक आहे. गरीब कुटुंबातील विधवा महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे या साठी हि योजना सुरू करण्यात आली आहे.

विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र सरकार ने राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरु केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांना दर महिन्याला ६०० रुपये इतकी आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेमुळे या महिलांना आर्थिक आधार मिळणार आहे.

या योजनेमुळे गरीब कुटुंबातील विधवा महिलांना आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे जेणेकरून त्यांना त्यांचे आयुष्य सुखाने व्यतीत करता येईल. ज्या महिलांच्या पतीचे निधन अपघाती किंवा अचानक होते त्या महिलांना आर्थिक आधाराची गरज असते अश्या वेळेस कुणाकडून उधार किंवा कर्ज काढून त्या आपले जीवन व्यतीत करतात परंतु त्यांच्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून महारष्ट्र सरकार ने या योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या मासिक आर्थिक मदतीसाठी विधवा महिलेचे जास्तीतजास्त वय हे ६५ वर्ष असावे अशी मर्यादा लावण्यात आली आहे.

आयुष्याचा जोडीदार गेला कि सगळे आयुष्य हे उजाड होऊन बसते , नातेवाईक किंवा मित्रमंडळी हि नावापुरती असतात. गरज पडल्यावर मदतीसाठी येणारे खूप कमी असतात. आणि त्यातही जेव्हा केव्हा आर्थिक मदत हवी असते अश्या वेळेला तर मदत करणारे अजूनच कमी होऊन जातात. मग अश्या वेळेला त्या विधवा महिलेला वेळेवर एखाद्या ठिकाणी काम मिळायला जर उशीर झाला किंवा काम मिळालेच नाही तर तिचा उदरनिर्वाह होणे कठीण आहे. या अश्या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकार ने विधवा पेन्शन योजना सुरु केली आहे.

विधवा पेन्शन योजनेमध्ये महिलेला महिन्याला ६०० रुपये मिळतील आणि जर तिला एका पेक्षा जास्त अपत्य असतील तर महिन्याला ९०० रुपये इतकी आर्थिक मदत मिळेल. हि ९०० रुपये तिचा मुलगा वयाच्या २५ वर्षाचा होईपर्यंत मिळेल.आणि जर तिला मुलगी असेल तर मुलीच्या लग्नानंतर देखील महिलेचे वय ६५ वर्ष होई पर्यंत तिला या योजनेचा लाभ घेता येईल. प्राथमिक दृष्टीने बहितले तर हि मिळणारी रक्कम कमी वाटू शकते परंतु मासिक मिळणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे काही अंशी का असेना त्या विधवा महिलाचा मुलभूत गोष्टी वर होणार्या खर्चाची मदत तिला मिळणार आहे आणि त्यामुळे त्या महिलेचे थोडे का असेना मानसिक त्रास कमी होणार आहे.

महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे विधवा महिलांना समाजात मानाने जगण्यास मदत होईल तसेच त्यांना स्वावलंबी असल्याची भावना उत्पन्न होऊन आत्मविश्वासाने उर्वरित आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा नक्कीच मिळेल. या योजनेमुळे विधवा महिलांच्या मनातील नकारात्मक भावना संपून त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत मिळेल. आणि परिणामी नकारात्मक भावना येऊन होणार्या आत्महत्त्या सारखे अपराध टाळण्यास देखील मदत होईल.

आपण विधवा झालो म्हणजे आता या समाजाचा भाग नाही किंवा समाज आपला स्वीकार करणार नाही हे आणि अश्या काही विचारांना काही अंशी का असेना विधवा पेन्शन योजनेमुळे रोख लागेल. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे विधवा महिलांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न काही प्रमाणात नक्कीच सुटेल.

आपण या लेखामध्ये विधवा पेन्शन योजनेबद्दल खालीलप्रमाणे माहिती घेणार आहोत.

  • विधवा पेन्शन योजने उधिष्ट
  • विधवा पेन्शन योजने पात्रता
  • विधवा पेन्शन योजने फायदे
  • विधवा पेन्शन योजने साठी लागणारी कागदपत्रे

VIDHWA PENSION YOJANA 2024|विधवा पेन्शन योजना २०२४ महाराष्ट्र चे उधिष्ट

  • विधवा पेन्शन योजना चे उधिष्ट खालीलप्रमाणे आहेत.
  • गरीब कुटुंबातील विधवा महिलेला स्वावलंबी बनविणे
  • विधवा महिलेस आर्थिक आधार देऊन तिला आत्मसन्मानाने जागण्यास शिकविणे
  • पतीचे निधन झाल्यावर तिला कुणावरही अवलंबून राहणे टाळता यावे.
  • मुलांचे शिक्षण करता यावे हे एक उद्धिष्ठ
  • पतीच्या मृत्यू पश्चात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये.

VIDHWA PENSION YOJANA 2024|विधवा पेन्शन योजने ची पात्रता आणि नियम

VIDHWA PENSION YOJANA 2024|विधवा पेन्शन योजनेचे पात्रता आणि नियम खालीप्रमाणे आहेत.

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील नियमित रहिवासी असलेल्या विधवा महिला या योजनेचा अर्ज करू शकता. बाहेरील राज्यातील महिलांना या योजनेहा अर्ज महाराष्ट्र राज्य मध्ये करता येणार नाही.
  • ज्या गरीब कुटुंबातील विधवा महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या महिलेचा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१००० रुपये पेक्षा जास्त नसावे.
  • महाराष्ट्र राज्यातील सर्व दारिद्र्य रेशेखालील विधवा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकता.
  • अर्जदार महिलेने जर दुसरे लग्न केले तर ती या योजनेसाठी पात्र राहू शकत नाही.
  • लाभ घेऊ इच्छित महिलेचे बँक खाते असावे आणि हे बँक खाते आधार कार्ड शी संलग्नित असावे.

VIDHWA PENSION YOJANA 2024|विधवा पेन्शन योजने चे फायदे

VIDHWA PENSION YOJANA 2024|विधवा पेन्शन योजने चे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

  • या योजनेच्या माध्यमातून विधवा महिलेला आर्थिक आधार मिळणार आहे.
  • विधवा महिलेला मिळणारी आर्थिक मदत हे दर महिन्याला मिळणार आहे.
  • विधवा महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये आणि त्यांना लागणारी मदत हि वेळच्या वेळी DBT च्या माध्यमातून थेट बँक खात्या मध्ये जमा होणार आहे.
  • या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना रुपये ६०० दर महिन्याला थेट बँक खात्यामध्ये जमा करून मिळतील.जर त्या महिलेला १ किंवा २ अपत्य असतील तर ९०० रुपये इतकी मासिक मदत दिली जाणार आहे.

VIDHWA PENSION YOJANA 2024|विधवा पेन्शन योजने साठी लागणारे कागदपत्रे

VIDHWA PENSION YOJANA 2024|विधवा पेन्शन योजने साठी लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

  • विधवा महिलेचे आधार कार्ड
  • विधवा महिलेच्या पतीचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र
  • वयाचा दाखला प्रमाणपत्र
  • विधवा महिलेच्या बँक खात्याचे तपशील.
  • महाराष्ट्र राज्याचे अधिकृत रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • कोणतीही महिला जर मागासलेल्या प्रवर्गातील असेल तर जात प्रमाणपत्र
  • महिलेचा पास पोर्ट आकारातील फोटो
  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांक.

गर्भवती महिलांना मिळणार ५००० रुपये इतकी आर्थिक मदत , जाणून घ्या या योजनेबद्दल.

म्हातारपणात मिळावा खात्रीपूर्वक मासिक पेन्शन , जाणून घ्या या योजनेबद्दल.

महिलांसाठी खास लखपती दीदी योजना ,इथे क्लिक करा.

VIDHWA PENSION YOJANA 2024|विधवा पेन्शन योजनेचा अर्ज कुठे आणि कसा करावा

विधवा पेन्शन योजनेचा अर्ज आपले सरकार पोर्टल वर मिळेल. पोर्टल वरून अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रिंट घेऊन विचारलेली माहिती व्यवस्थित भरून योग्य ते कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालय,तहसील आणि तलाठी कार्यालय या ठिकाणी जमा करावा लागेल. त्यानंतर अजर चेक करून जर संबंधित महिला योजनेसाठी पात्र असेल तर त्या महिलेला तसे कळविले जाईल.

विधवा पेन्शन योजनेमुळे खरच गरीब कुटुंबातील विधवा महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे. आपलं जोडीदार गेल्यानंतर खरच कोणीच आपली साथ देत नाही त्यात आर्थिक मदत मिळणे खूप अवगढ होऊन बसते आणि मग त्यमुळे येणारा मानसिक त्रास , मुलाबाळांची होणारी हेडसांड हे टाळण्या साठी या योजनेचा लाभ होईल.विधवा पेन्शन योजनेमध्ये मिळणारे आर्थिक मदत हि भलेही खूप जास्त नसेल पण तरीही “बुडत्याला काठीचा आधार ” या म्हणी प्रमाणे विधवा महिलेला महिन्याचा होणार्या खर्चामध्ये थोडा हातभार नक्कीच लागेल.

आपले सरकार या पोर्टल वर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

विधवा पेन्शन योजनेशी संबंधित काही प्रश्न (FAQ):

विधवा पेन्शन योजना काय आहे?

महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी सुरु करण्यात आलेली एक महात्वाकांशी योजना आहे.

विधवा पेन्शन योजनेसाठी कोण पत्र असेल?

महाराष्ट्र राज्यातील निवासी असलेल्या विधवा महिला या योजनेसाठी पात्र असतील.

विधवा पेन्शन योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो ?

महाराष्ट्र राज्यातील दारिद्य्र रेषेखालील अश्या विधवा महिला ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१,००० रुपये पेक्षा कमी आहे.

विधवा पेन्शन योजनेसाठी वयाची काही अट आहे का?

होय. विधवा पेन्शन योजनेसाठी विधवा महिलेचे वय कमीत कमी १८ तर जास्तीतजास्त ६५ वर्ष असावे.

विधवा पेन्शन योजनेंतर्गत मिळणारे आर्थिक मदत किती आहे?

विधवा पेन्शन योजनेंतर्गत मिळणारे मासिक आर्थिक मदत ६०० रुपये इतकी आहे आणि जर त्या विधवा महिलेला एक पेक्षा जास्त अपत्य असतील तर ९०० रुपये इतके मासिक आर्थिक मदत मिळेल.

विधवा पेन्शन योजनेंतर्गत मिळणारी आर्थिक मदत कशी मिळेल?

विधवा पेन्शन योजनेमध्ये मिळणारी रक्कम हि अर्जदार महिलेच्या आधार कार्ड संलग्नित बँक खात्यामध्ये DBT द्वारे मिळतील.

विधवा पेन्शन योजना बाहेरील राज्यातील महिलेला लागू आहे का?

नाही. विधवा पेन्शन योजना हि फक्त महाराष्ट्र राज्यातील निवासी असणाऱ्या विधवा महिलांसाठी आहे.

विधवा पेन्शन योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणती?

या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी या लेखामध्ये वर नमूद करण्यात आली आहे.

विधवा पेन्शन योजना कोण राबवीत आहे?

हि योजना महाराष्ट्र सरकारच्या निगराणीत महिला व बाल विकास मंत्रालय राबवणार आहे.

सर्व वाचकांना हि विनंती कि आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये जर कुणी अशी गरजू विधवा महिला असेल तर कृपया त्या महिलेपर्यंत हि माहिती नक्की सांगा किंवा त्या महिलेला हा लेख वाचण्यास सांगावा जेणेकरून त्या महिलेला या योजनेची संपूर्ण माहिती मिळेल आणि त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल.

सर्व वाचकांना अजून एक नम्र विनंती हि वेबसाईट केंद्र सरकार किंवा राज्य सरकार ची नाही किंवा त्याशी संबंधित देखील नाही तरी आपण या योजने शी संबंधित काही निर्णय घेत असणार तर वर दिलेली माहिती हि एकदा परत पडताळून बघा आणि मगच निर्णय घ्या. आम्ही फक्त या ठिकाणी या योजनेची माहिती मराठी वाचकांपर्यंत आपल्या मराठी भाषेमध्ये पोहचावी या साठी हा प्रयत्न केला आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी. आपल्याला आम्हाला काही अभिप्राय कळवावा वाटला तर आम्हाला abhimanmaarathi@gamil.com या मेल आयडी वर मेल लिहून कळवावा .