yashwantrao chavan gharkul yojana 2024
yashwantrao chavan gharkul yojana 2024 विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाना घरकुल मिळावे या साठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाना देखील हक्काचे पक्के घर मिळावे म्हणून महाराष्ट्र सरकार ने यशवंतराव चव्हाण घरकुल योजना ची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील इतर प्रवर्गातील कुटुंबाना वेगवेगळ्या योजनांच्या माधमातून जसे कि pm आवास योजना ,शबरी आवास योजने अतंर्गत स्वतःचे हक्काचे घर मिळत होते परंतु विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाना या योजनेंतर्गत घरकुल मिळत नव्हते म्हणून त्यंच्या साठी खास अशी हि योजना राबवण्यात येत आहे.
विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमधील कुटुंबांचे राहणीमान उंचावणे , त्यांना स्वावलंबी बनविणे त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे ,स्वावलंबी बनविणे अशे विविध प्रकारचे उद्देश या योजनेचे आहे.अश्या कुटुंबाना जागा उपलब्ध करून देऊन त्या जागेवर घर बांधून देऊन उर्वरित जागेवर विविध शासकीय योजनेंतर्गत त्या कुटुंबाना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हे या योजनेचे उद्देश आहे. या योजनेंतर्गत शासनाने आधी पण पहिल्या टप्प्यात निधी मंजूर केला होता आणि आता दुसर्या टप्प्यात देखील भरगोस निधी मंजूर करून दिला आहे. यामुळे राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाना प्रचंड असा आनंद झाला आहे.
राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाना स्वतंत्र अशी घरकुल योजना नव्हती परंतु यशवंतराव चव्हाण घरकुल योजना २०२४ यामुळे एक वेगळी अशी योजना या प्रवर्गातील कुटुंबाना मिळाली आहे.
महाराष्ट्र राज्यात विविध जाती धर्माचे लोक एकत्र मिळून राहतात. जातीय वर्गीकरणानुसार किंवा इतर प्रवर्गातील कुटुंबाना महारष्ट्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून घरकुले मंजूर झाली आहेत परंतु महाराष्ट्रातील गावोगावी फिरून आपलं उदरनिर्वाह चालवणाऱ्या विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमधील कुटुंबांना घरकुल साठी कुठल्याही दुसर्या योजनेमध्ये समाविष्ट करून घेतले नव्हते म्हणून हा समाज या सुविधेपासून वंचीत राजीलेला होता परंतु आता यशवंतराव चव्हाण घरकुल योजना २०२४ या योजनेमुळे या प्रर्वागातील कुटुंबाना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेचा लाभ दरवर्षी ३ गावांना दिला जातो. त्यातील २० कुटुंबाना या घरकुल योजनेचा लाभ मिळतो. विधवा,अपंग व्यक्ती,पूरग्रस्त व्यक्ती,किंवा घटस्पोटीत यांना प्राधान्यक्रम दिला जातो. घरासाठी जमीन या योजनेंतर्गत दिली जाईल पती आणि पत्नी यांच्या दोघांच्या नावावर हे असेल. परंतु अर्जदार विधवा किंवा घटस्पोटीत असल्यास हे घर आणि जमीन अर्जदाराच्या नावाने दिली जाईल. या योजनेंतर्गत मिळणारी जमीन आणि घर हस्तांतरित नाही ,हे विकता येणार नाही किंवा कुणाला भाड्याने देखील देता येणार नाही. तसे आढळून आल्यास त्यावर नियमाप्रमाणे सरकारी कारवाई केली जाऊ शकते.
या लेखामध्ये आपण यशवंतराव चव्हाण घरकुल योजना २०२४ बद्दल खालीलप्रमाणे माहिती घेणार आहोत.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना २०२४ योजनेबद्दल थोडक्यात
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना चे उद्दिष्ट
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना चे लाभार्थी
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना चे फायदे
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना नियम व अटी
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना साठी लागणारे कागदपत्रे.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना साठी अर्ज कोठे व कसा करावा.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना २०२४ योजनेबद्दल थोडक्यात
महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाना देखील हक्काचे पक्के घर मिळावे म्हणून महाराष्ट्र सरकार ने यशवंतराव चव्हाण घरकुल योजना ची सुरुवात केली आहे.या योजनेंतर्गत राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती मधील लोकांना हक्काचे घर मिळावे त्यांना समाजात मानाने जगता यावे आणि या समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामील करून घेता यावे असा या योजनेची दूरदृष्टी आहे.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना चे उद्दिष्ट
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना चे उद्दिष्ट हे खालीलप्रमाणे आहेत.
- महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाना त्यांचे हक्काचे पक्के घर मिळावे ,
- बदलत्या वातावरणात म्हणजेच कधी उन /कधी थंडी / कधी पाऊस अश्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागू नये
- समाजात त्यांना मानाने जगता यावे
- प्रगतशील समाजाचे आपणही एक भाग आहोत अशी भावना निर्माण करणे.
- विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाना हक्काच्या घरासाठी कुणावरही अवलंबून राहावे लागू नये.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना चे लाभार्थी
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना चे लाभार्थी हे खालीप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गातील नागरिक हे या योजनेचे लाभार्थी आहेत.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना चे फायदे
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना चे फायदे हे खालीलप्रमाणे आहेत.
- आर्थिक परिस्थिती नसलेल्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाना स्वतःचे हक्काचे अशे पक्के घर मिळेल.
- समाजातील मागासलेल्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती मधील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील केले जाईल.
- विमुक्त जाती आणि भटक्या जमाती मधील लोकांना स्वावलंबी करून त्यांना त्यांचे हक्काचे अशे घर मिळेल.
- डोंगराळ भागातील लाभार्थी साठी १.३० लाख तर सर्वसाधारण क्षेत्रातील लाभार्थी साठी १.२० लाख रुपये अनुदान मिळेल .
- स्वतःचे घर बांधताना मनरेगा अतंर्गत ९० दिवसांचा रोजगार त्यांना दिला जाईल .
- घरकुल योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदान सोडून स्वच्छ भारत मिशन अतंर्गत शौचालय बांधकामासाठी वेगळे १२००० रुपये मिळतील.
अधिकृत संकेतस्थळ साठी इथे क्लिक करा .
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना साठी लागणारे कागदपत्रे.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना साठी लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- भूमिहीन प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- कुटुंबातील इतर कुठल्याही सदस्य चे राज्यात कुठेही घरकुल योजनेंतर्गत घर नसल्याचे घोषणापत्र १०० रुपयेच्या बॉंड पेपर वर लागेल.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना नियम व अटी
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना नियम व अटी खालीलप्रमाणे आहेत.
- लाभार्थी कुटुंब हे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गातील असावे आणि गावोगावी भटकून आपलं उदरनिर्वाह करणारे असावेत.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा कमी असावे.
- लाभार्थी कुटुंबाचे स्वताच्या मालकीचे घर नसावे.
- अर्जदाराचे कुटुंब हे झोपडी किंवा कच्च्या घरात राहत असावे, पक्के घर असू नये.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा,अन्य राज्यातील रहिवासी असल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- अर्जदाराच्या कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात अन्य कुठेही घरकुल योजनेंतर्गत घर घेतलेले नसावे.
- या योजनेचा लाभ कुटुंबातील कुठल्याही एकाच व्यक्तीस मिळेल.
घरकुल योजनेसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची कार्यपद्धती
घरकुल योजनेसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची कार्यपद्धती खालीप्रमाणे असेल.
वसाहती साठी आवश्यक असणारी जमीन जिल्हास्थरीय समिती मार्फत उपलब्ध करून दिली जाईल.
वसाहतीचा प्रकल्प अहवाल ,बांधकाम तसेच पायाभूत सुविधा या जिल्हा ग्रामीण विकास यंत्राने मार्फत करण्यात येईल.
घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्याक्षेतीखाली एक समिती तयार करण्यात येईल आणि सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण अधिकारी,व सहाय्यक संचालक ,विजाभज ,इमाव व विमाप्र कल्याण संचनालय हे सदस्य्य सचिव असतील.
घरकुल योजनेचे समितीचे कार्य खालिलप्रकारे चालेल.
घरकुल योजनेसाठी शासकीय जमिनीची निवड करणे.
शासकीय जमीन उपलब्ध नसल्यास खाजगी जमिनीची दर निच्छित करून जमीन खरेदी करणे.
पात्र लाभार्थी कुटुंबाची निवड करणे, पात्र लाभार्थी किंवा त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य ला घरकुल योजनेंतर्गत यापूर्वी घर मिळाले नसल्याची खात्री करणे.
सरकारी किंवा खाजगी जमिनीचे layout तयार करून पात्र कुटुंबांसाठी घर तयार करून देणे.
लाभार्थी कुटुंबाना विविध शासकीय योजनेंतर्गत स्थानिक रोजगार उपलब्ध करून देणे.
तालुकास्थरीय समिती देखील यामध्ये सक्रीय असते ,या योजनेसाठी योग्य अश्या शासकीय जमिनीची निवड करून त्याची शिफारस जिल्हास्थरीय समितीस करणे. शासकीय जमीन उपलब्ध नसल्यास खाजागी जमीन विकत घेऊन ती लाभार्थ्यांना हस्तांतरित करणे. या प्रक्रियेमध्ये सहाय्य करण्यासाठी संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्याक्षेतीखाली तालुकास्थरीय समिती असेल.
आता महिलांना स्वयंपाक घरातील त्रास होणार कमी आणि पैशाची पण बचत होणार.
सुशिक्षित बेरोजगार आहात का? सरकार तुम्हाला देणार महिना ५००० रुपये भत्ता.
घर बांधकामासाठी शासन देणार १.३० लाख रुपये इतके अनुदान. जानून घ्या तुम्हाला मिळतील का?
राज्यातील गरीब विधवांना मिळणार दर महिन्याला पेन्शन . किती आणि कसा बघा.
गरोदर महिलांसाठी खुश खबर! ,मिळणार अनुदान . कसे ते बघा.
तरुणपणी कमवा आणि म्हातारपणात मिळवा खात्रीपूर्वक पेन्शन
शेती मशागती साठी विकत घ्या ट्रक्टर ,सरकार देणार भरभरून आर्थिक अनुदान.
सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.
सर्व वाचकांना एक विनंती हि वेब साईट केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाही किंवा त्या संबंधी देखील नाही. जर आपण वर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे या योजनेबद्दल काही निर्णय घेणार असणार तर कृपया वर दिलेली माहिती परत एकदा पडताळून बघा आणि मगच हवा तो निर्णय घ्यावा. आम्ही फक्त या योजनेची माहिती आपल्या मराठी वाचकांना आपल्या मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या उद्देशाने हा प्रयत्न केला आहे. कृपया याची नोंद घ्यवी.
जर आपण आमच्या या लेखाबद्दल किंवा आमच्या वेबसाईट बद्दल जर काही अभिप्राय देऊ इच्छित असणार तर कृपया आम्हाला abhimanmaarathi@gmail.com या मेल आयडी लिहून कळवावा.
धन्यवाद.